राजकीय
बेरोजगार तरुणांच्या हाताला शाश्वत काम मिळाले पाहिजे म्हणून प्रतिनिधित्व करण्याची संधी शोधतोय हा उमदा तरुण….!
केज दि.२१ – विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या संपर्क दौऱ्याला दिवसेंदिवस वेग येत आहे. मागच्या दोन महिन्यांपासून इच्छुक उमेदवार वेगवेगळ्या पक्षाकडे जाऊन तिकिटाची मागणी करतच आहेत त्याचबरोबर विधानसभा मतदारसंघातील जनसंपर्क वाढवण्यासाठी वेगवेगळ्या योजना आखत आहेत. केज विधानसभा मतदारसंघांमध्येही अनेक उमेदवार हे इच्छुक आहेत आणि आपापल्या परीने जनसंपर्क करताना दिसत आहेत. परंतु या सर्वांमध्ये एक तरुण चेहरा सध्या तरुणाईमध्ये आकर्षणाचा विषय झालेला असून कित्येक ठिकाणी या तरुणाचे जोरदार स्वागत होत आहे.
केज विधानसभा मतदारसंघांमध्ये बरेच इच्छुक उमेदवार मागच्या दोन महिन्यांपासून कामाला लागलेले आहेत. काही इच्छुकांनी थेट पक्षात प्रवेश केलेला आहे तर काहीजण काठावर बसून आहेत. परंतु विधानसभा मतदारसंघांमध्ये आपण सर्वांना परिचित व्हावे यासाठी सकाळपासून ते रात्रीपर्यंत गावोगाव फिरताना दिसत आहेत. यावेळी अगदी चंद्र, सूर्य आणण्यापासून ते पाऊस पाडण्यापर्यंत आणि नद्या सुद्धा आणण्यापर्यंत आश्वासने देत आहेत. मात्र यातीलच डॉ.राहुल शिंदे नावाचा एक चेहरा हा सुशिक्षित बेरोजगार तरुणांच्या प्रश्नाकडे लक्ष देत असून मतदारसंघातील बेरोजगार तरुणांना कायमस्वरूपी काम मिळावे यासाठी काम करण्याचा मनोदय व्यक्त करत आहे. जनसंपर्क दौऱ्यादरम्यान तरुणांची जी सध्याची परिस्थिती आहे त्या प्रश्नाला हात घालत असून जे कधी पूर्णच होणार नाहीत असे आश्वासन न देता जे पूर्ण होतील अशी आश्वासने देत असल्याने तरुणांमध्ये डॉक्टर राहुल शिंदे यांच्यावर विश्वास दृढ होत चाललेला आहे.
केज विधानसभा मतदारसंघांमध्ये बेरोजगारी मिटवण्यासाठी शाश्वत अशा एकाही प्रकल्पाची उभारणी झालेली नाही. काही अपवाद वगळता मतदार संघातील हजारो उच्चशिक्षित तरुण आज रोजगाराच्या प्रतीक्षेत आहेत. आणि म्हणूनच डॉक्टर राहुल शिंदे या प्रश्नावर फोकस करत असून या तरुणांच्या हाताला जर काम मिळाले तर इतर काही गोष्टी मोठ्या प्रमाणावर करण्याची गरजच भासणार नाही असा विश्वास तरुणांना दाखवत आहेत. त्यामुळे हा उमदा करून आपल्या समस्येविषयी बोलताना दिसतोय, तळमळ आहे असे वाटू लागल्याने गावागावातील बेरोजगार तरुण डॉक्टर शिंदे यांना आपल्या गावामध्ये बोलावून तरुणांना मार्गदर्शन करण्याची विनंती करत आहेत.
डॉक्टर राहुल शिंदे जसे बेरोजगारीवर बोलतात त्याचप्रमाणे मतदारसंघातील नागरिकांच्या आरोग्याच्या बाबतीत ही आपल्या योजना कार्यान्वित करण्याच्या प्रयत्नात आहेत. अवघ्या काही दिवसांमध्ये डॉक्टर शिंदे हे मतदारसंघातील प्रत्येक गावात आरोग्य शिबिर घेण्याच्या तयारीत असून, ज्यांना महागडे उपचार घेणे शक्य होत नाही अशा रुग्णांना वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून त्यांच्यावर उपचार करण्यासाठी मदत ही करणार आहेत. मतदार संघातील वेगवेगळ्या गावांमध्ये अनेक कार्यक्रमांना डॉक्टर शिंदे यांना अगदी आवर्जून बोलावल्या जात असून अशाच प्रकारचा परिस्थितीची जाण असलेला मतदार संघाला प्रतिनिधी पाहिजे अशा प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. त्यामुळे प्रतिनिधित्व करण्यासाठी केवळ सत्ता पाहिजे किंवा पैसाच पाहिजे असे काही नसून मतदारांनी जर ठरवले तर अगदी सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तीलाही ते पदावर नेऊन बसऊ शकतात याचे अनेक उदाहरणे मागच्या काही निवडणुकांमध्ये दिसून आलेले आहे.
दरम्यान डॉक्टर राहुल शिंदे यांच्याकडे एक विशिष्ट व्हिजन असल्याने अवघ्या काही दिवसांमध्येच ते मतदार संघामध्ये आणि विशेषता तरुणांमध्ये लोकप्रिय होताना दिसत आहेत.