ब्रेकिंग

राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांची तब्येत अचानक बिघडली….!

9 / 100

मुंबई दि.२६ – राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची अचानक प्रकृती बिघडल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे छगन भुजबळ यांना तातडीने बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. छगन भुजबळ यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. छगन भुजबळ यांना पुण्याहून विशेष विमानाने मुंबईला आणण्यात आलं आहे. त्यांना मुंबईत बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.

                छगन भुजबळ यांच्या कार्यालयाकडून आता अधिकृत माहिती देण्यात आली आहे. राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ हे आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमांसाठी पुणे येथे दौऱ्यावर होते. ताप आणि घशाचा संसर्ग असल्याने आज त्यांना अधिक त्रास जाणवल्याने दुपारी पुणे येथून मुंबईला बॉम्बे हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले आहे.
        दरम्यान, मंत्री छगन भुजबळ यांची प्रकृती स्थिर असून कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असं आवाहन छगन भुजबळ यांच्या कर्यालयाकडून करण्यात आलं आहे.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close