#Accident

केज – अंबाजोगाई रोडवर बस पलटी….!

12 / 100
केज दि.३० – राष्ट्रीय महामार्गावरील चंदनसावरगाव जवळ एसटी बस पलटी होऊन अपघात झाल्याची घटना दुपारी १.०० वाजताच्या दरम्यान घडली आहे. बस मधील दहा जणांना केज येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविले असून त्यातील एक चालक व अन्य एक जन गंभीर जखमी असल्याची प्राथमिक माहिती देण्यात आली आहे. तर काहींना अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे.
          अहमदनपूर येथून छत्रपती संभाजीनगरला ५० प्रवाशी घेऊन ही एसटी बस क्रमांक एम एच -२० बी एल – २५७२ जात होती, केज तालुक्यातील चंदनसावरगाव जवळ असलेल्या मोरया हॉटेल जवळ एसटी बस पलटी होऊन अपघात झाला आहे.
       दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच अपघातस्थळी पोलीस उपनिरीक्षक चेंनाशेट्टी दाखल झाले आहेत. दरम्यान अपघातात कसा झाला याची माहिती अद्याप समजलेली नाही.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close