महाराष्ट्र
उपकुलसचिव, कक्षाधिकारीपदी पदोन्नती…!
छत्रपती संभाजीनगर, दि.१ – डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील १२ कर्मचा-यांना वर्ग एक व दोन या पदांवर पदोन्नती देण्यात आली आहे. यामध्ये सहायक व उपकुलसचिव अशी सहा तर कक्षाधिकारी सहा अशा १२ पदांचा समावेश आहे.
शिक्षेत्तर कर्मचा-यांच्या पदोन्नतीचा प्रश्न २०२१ पासून प्रलंबित होता. कुलगुरु डॉ.विजय फुलारी यांनी पदभार घेतल्यानंतर शिक्षक व कर्मचारी दोन्ही पदांचा पदोन्नतीचा प्रश्न हाती घेतला. दोन महिन्यांपुर्वी सर्व कर्मचा-यांची वरिष्ठता यादी प्रकाशित करण्यात आली. कुलसचिव डॉ.प्रशांत अमृतकर अस्थापना विभागाचे उपकुलसचिव डॉ.गणेश मंझा, यांच्यासह कर्मचा-यांनी यासाठी प्रयत्न केले. यादी प्रकाशित झाल्यानंतर अस्थापना समितीत पदोन्नतीसाठीचा प्रश्न मार्गी लावण्यात आला. २०२१ नंतर पदोन्नतीचा प्रश्न मार्गी लावला. यामध्ये परीक्षा विभागातील हेमलता ठाकरे व पदव्यूत्तर विभागातील कृष्णा दाभाडे यांना उपकुलसचिवपदी पदोन्नती देण्यात आली. तर कक्षाधिकारी शुभांगी बिन्नीवाले, अशिष वडोदकर, रत्नाकर मुळे व डॉ.पंजाब पडुळ यांना सहायक कुलसचिवपदी पदोन्नती देण्यात आली. तसेच सहा वरिष्ठ सहायक पदातील कर्मचा-यांना कक्षाधिकार पदी पदोन्नती देण्यात आली. यामध्ये विजय दरबस्तवार, नरेंद्र मोदी, कानाजी काकडे, अनिल खामगांवकर, भीमराव महाडीक, प्रवीण जावळे यांचा समावेश आहे. या सर्व अधिका-यांनी मा.कुलगुरु डॉ.विजय फुलारी यांचे आभार मानले. यावेळी कुलसचिव डॉ.प्रशांत अमृतकर, वित्त व लेखाधिकारी सविता जंपावाड, कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष डॉ. कैलास पाथ्रीकर, उपकुलसचिव डॉ.गणेश मंझा, डॉ.संजय कवडे आदींची उपस्थिती होती.