आपला जिल्हा
महायुतीच्या काळात महिला व मुली असुरक्षित – खा. रजनीताई पाटील….!
बीड दि.७ – बदलापुरची घटना अद्याप विसरली नाही तोवर बीड जिल्ह्यातील माजलगाव येथील एका साडे पाच वर्षाच्या चिमुरडीवर झालेला अत्याचार हा अतिशय किळसवाणा व नीच पणाचा कहर आहे. शिक्षण, शिक्षक व शैक्षणिक परिसर हे पवित्र मानले जातात मात्र सद्या हे उलट होताना दिसत असल्याचे मत व्यक्त करत खासदार रजनीताई पाटील यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे.
एकीकडे सरकार लाडकी बहीण योजना देऊन महिलांना खुश करण्याचा प्रयत्न करत असले तरी प्रत्यक्षात राज्यातील बहिणीवर किती अत्याचार होत आहेत मागच्या काही महिन्यांपासून अत्याचाराच्या किती घटना घडत आहेत हे देखील सरकारमध्ये असलेल्या सत्ताधाऱ्यांनी चिंतन करावे. महाराष्ट्रात दररोज अशा अनेक घटना समोर येत असताना राज्य सरकार मात्र याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे. महायुतीच्या सरकारने महिलांच्या सुरक्षेकडे लक्ष देणे अपेक्षित आहे. मात्र निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हे सरकार फक्त आणि फक्त राजकारण करत आहे. मात्र अतिशय लहान, अल्पवयीन मुली, स्त्रिया सद्या असुरक्षित आहेत. 25 ते 28 सप्टेंबर च्या दरम्यान ही अमानुष घटना घडली असून याचा एक महिला म्हणून तसेच काँग्रेस पक्षाचा वतीने जाहीर निषेध करते.
दरम्यान, यात दोषी असणाऱ्या आरोपीला कडक शासन व्हावे व जेणे करून नराधमाना कायद्याचा धाक राहिला पाहिजे. ही राज्य सरकारकडून अपेक्षा असल्याचेही त्या म्हणाल्या.