आपला जिल्हा
दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यात तगडा पोलीस बंदोबस्त….!
बीड दि.१० – जिल्ह्यात दिनांक १२/१०/२०२४ रोजी दसऱ्या निमीत्त सावरगांव घाट येथील भगवान भक्तीगड व श्री. क्षेत्र नारायणगड असे दोन दसरा मेळावे होत आहेत. त्या पार्श्वभुमीवर बीड जिल्हा पोलीस दल सतर्क असुन त्यासंबंधाने बीड जिल्हा पोलीस दलाने सर्वोतोपरी तयारी केलेली आहे.
दसरा मेळाव्यासाठी बीड जिल्हा तसेच छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्रातील छत्रपती संभाजीनगर व जालना जिल्ह्यातुन बंदोबस्त मागवण्यात आला आहे. तसेच राज्य राखीव पोलीस बल दौंड येथुनही बंदोबस्त मागविण्यात आला आहे. दसरा मेळाव्यासाठी २ अपर पोलीस अधीक्षक, ५ पोलीस उपअधीक्षक, १५ पोलीस निरीक्षक, ६० सपोनि/पोउपनिरी. दर्जाचे अधिकारी, बीड जिल्ह्यातील ७०० पुरुष पोलीस अंमलदार, १०० महीला पोलीस अंमलदार, शहर वाहतुक शाखा व बाहेरुन आलेले एकुण १०० पोलीस अंमलदार, ३०० होमगार्ड, महामार्ग सुरक्षा पथकाचे २ अधिकारी व ५० पोलीस अंमलदार, बीड पोलीस दलाचे व बाहेरुन आलेले एकुण ९ दंगा काबु पथक, तसेच राज्य राखीव पोलीस बल, दौंड येथील २ तुकड्या सदर बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आल्या आहेत.
तसेच दोन्ही दसरा मेळाव्याच्या ठिकाणी वाहनांसाठी स्वतंत्र पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. परंतु जे वाहन धारक विनाकारण पार्किंग व्यतिरीक्त इतर ठिकाणी वाहने लावुन रहदारीस अडथळा निर्माण करतील अशी वाहने टोईंग करुन त्या वाहन धारकांवर कारवाया करण्यात येणार आहेत. तसेच दसरा मेळाव्या ठिकाणी दारु अथवा इतर गुंगीकारक पदार्थाचे सेवन करतांना कोणी मिळुन आल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार आहे.तर दसरा मेळाव्याच्या ठिकाणी प्रक्षोभक भाषण/घोषणा/बॅनरबाजी करुन दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करणाऱ्यांवर कडक कावाई करण्यात येणार आहे.
दरम्यान, दोन्ही दसरा मेळाव्याच्या ठिकाणी जातांना व येतांना सर्व वाहन धारकांनी तसेच कार्यकर्त्यांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे तसेच प्रक्षोभक भाषण अथवा वक्तव्य टाळुन सामाजीक सलोख कायम ठेवण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी सर्व कार्यकर्त्यांना केले आहे.