#Election
भाजपची पहिली यादी जाहीर….!

केज दि.२० – भारतीय जनता पार्टीची विधानसभा निवडणुकीची पहिली यादी जाहीर झाली असून यामध्ये 99 उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत.
यामध्ये पहिल्या यादीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह केज विधानसभा मतदारसंघाच्या विद्यमान आमदार नमिता मुंदडा यांचेही नाव घोषित करण्यात आले आहे. मागच्या विधानसभा निवडणुकीला नमिता मुंदडा यांनी राष्ट्रवादी पक्षातून भाजपामध्ये प्रवेश करत तिकीट मिळवले आणि निवडूनही आल्या. दरम्यान, भाजपने 99 उमेदवाराची यादी अधिकृतरित्या प्रकाशित केले असून यामध्ये पहिल्याच यादीत नमिता मुंदडा यांचे नाव आहे. त्यामुळे आता नमिता मुंदडा यांच्यापुढे महाविकास आघाडीचा उमेदवार कोण येतो ? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.