क्राइम

मोटार सायकल चोरी प्रकरणातील  आरोपी जेरबंद…!

6 / 100
बीड दि. २१ –  पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी मोटार सायकल चोरीचे जास्तीत जास्त गुन्हे उघडकीस आणण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेला आदेश दिलेले आहेत. त्यावरून पोलीस निरीक्षक, स्था.गु.शा.बीड यांनी मोटार सायकल चोरी करणारे आरोपींची माहिती काढुन गुन्हे उघडकीस आणण्यासाठी अधिपत्याखालील अधिकारी यांना योग्य मार्गदर्शन करून आदेश दिलेले आहेत.
         त्या अनुषंगाने पो.स्टे.पेठ बीड गुरनं 183/2024 क.303(2) BNS या गुन्हयातील बुलेट चोरीचा तपास करीत असतांना दिनांक 19/10/2024 रोजी पोलीस पोउपनि सिध्देश्वर मुरकूटे यांना सदर बुलेट समर्थ विनोद काळे रा.चंदन आरकेड छ.संभाजीनगर याने चोरल्याची गोपनिय माहिती मिळाली. त्यानुसार तेव्हा तात्काळ पोलीस निरीक्षक उस्मान शेख स्था.गु.शा.यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाने समर्थ विनोद काळे वय 23 रा. चंदन आरकेड छ.संभाजीनगर यास ताब्यात घेवुन त्याचेकडुन गुन्हयात चोरीस गेलेली मोटार सायकल जप्त करण्यात आली आहे. तसेच त्याचेजवळ आणखीन एक मोटार सायकल मिळुन आली. सदर मो.सा. पो.स्टे.शिवाजीनगर (मुंबई शहर) गुरनं 324/2022 कलम 379 भादंवि मधील चोरीची असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
आरोपीकडुन आणखीन गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असुन आरोपी व दोन मोटार सायकल असा एकुण 1,40,000/- चा मुद्देमाल जप्त केले आहे.आरोपीस पो.स्टे. पे बीड यांचे ताब्यात देण्यात आलेले असुन पुढील तपास पो.स्टे.पेठ बीड करीत आहेत.
               सदरील कामगिरी अविनाश बारगळ पोलीस अधीक्षक,बीड, सचिन पांडकर अपर पोलीस अधीक्षक बीड, उस्मान शेख पोलीस निरीक्षक स्था.गु.शा.बीड यांचे मार्गदर्शनाखाली पोउपनि सिध्देश्वर मुरकूटे, सफौ/तुळशीराम जगताप, पोह/मनोज वाघ, कैलास ठोंबरे, राहुल शिंदे, विकास वाघमारे यांनी केली आहे.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close