विधानसभा निवडणूक अनुषंगाने दि. 25 ऑक्टोबर रोजी दुपारी एकच्या दरम्यान पोलीस ठाणे बीड शहर हद्दीमध्ये सुभाष रोडला नाकाबंदी करत असताना पोलीस नाकाबंदी पथकाला पाच लाख रुपयांची कॅश मिळून आली आहे. सदरील कॅशी जप्त करण्यात आली असून, पुढील कारवाई पोलीस करत आहेत.अनंत कैलास दहिवाळ यांच्या ताब्यातून ही कॅश मिळाल्याची माहिती पोलिसांनी दिली. तात्काळ सदर माहिती आचारसंहिता अनुषंगाने कार्यरत असलेल्या FST पथकास ही पुरवण्यात आली आहे.
सदरील कारवाई पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, उपविभागीय पोलिस अधिकारी विश्वांबर गोल्डे, पोलीस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ यांचे मार्गदर्शनाखाली सपोनी बाबा राठोड, परि.पोउपनि रियाज शेख, पोना जयसिंग वायकर, पोअं मनोज परजने, पोअं अशपाक सय्यद यांनी केली आहे.