संपादकीय
आगीत ऊसतोड मजुराचे घर जळून खाक…..!
केज दि.२७ – तालुक्यातील तांदळे वस्तीवरील एका घराला शनिवारी दुपारी एकच्या दरम्यान अचानक आग लागली आणि यामध्ये एका ऊसतोड मजुराचे घर जळून खाक झाले. यामध्ये सुमारे 50 ते 60 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
तरनळी पासून जवळच असलेल्या तांदळे वस्तीवर भारत रंगनाथ सानप यांचे घर आहे. मात्र शनिवारी (दि.२६) दुपारी अचानक घराला आग लागली आणि यामध्ये घरातील संसारोपयोगी साहित्यासह रोख रक्कम ही जळून खाक झाली. भारत रंगनाथ सानप यांचे पूर्ण कुटुंबीय ऊसतोड मजूर आहेत. आणि अशा हातावर पोट असणाऱ्या कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे.
दरम्यान सदरील घटनेची माहिती सानप यांनी प्रशासनाला देण्याचा प्रयत्न केला परंतु निवडणुकीच्या धामधूमी मध्ये अद्याप पर्यंत कुणीही तिकडे फिरकलेले नाही. आणखी पंचनामा झाला नसून कुठल्याही प्रशासकीय अधिकाऱ्याने याची दखल न घेतल्याने सानप कुटुंबीय उघड्यावर आलेले आहे. तरनळी सज्जाचे लाठी यांनाही सानप यांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु तलाठ्यांचे प्रतिनिधी यांनी सध्या निवडणूक असल्याने सोमवारी तुमच्याकडे कुणीतरी येईल असे सांगून सानप कुटुंबीयांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे. मात्र या कुटुंबाला प्रशासनाच्या वतीने दिलासा देण्याची गरज असून पंचनामा करून किमान नुकसान भरपाई मिळावी अशी माफक माफक अपेक्षा सानप कुटुंबियांची आहे.