#Election
केज विधानसभा : ”या” उमेदवारांचे अर्ज झाले बाद….!
केज दि.३० – केज विधानसभा राखीव मतदार संघातून एकूण 47 उमेदवारी अर्ज दाखल झालेले आहेत. यामध्ये नामनिर्देशन पत्र परत घेण्याच्या अगोदरच चार उमरद्वारांचे अर्ज बाद झाल्याने ते मैदानातून बाहेर पडले आहेत.
केज विधानसभा राखीव मतदारसंघांमध्ये एकूण 47 उमेदवारी अर्ज अर्ज भरण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत दाखल झाली आणि दिनांक 30 रोजी अर्जाची छाननी झाली. यामध्ये सतीश काशिनाथ पटेकर, आसरतभगवान लोंढे, हिराबाई दिपक कांबळे आणि अनिल मसू डोंगरे असे एकूण चार अर्ज बाद झाल्याने ते निवडणुकीच्या मैदानातून बाहेर पडले आहेत. आणि आता येत्या चार तारखेला अर्ज परत घेण्याचा दिवस आहे. त्या दिवशी किती जण आपले अर्ज परत घेतात ? त्यानंतरच मैदानात राहणाऱ्यांची नेमकी संख्या ठरणार आहे.
मात्र अनेकांना निवडणूक लढवण्याचा जो छंद भरलेला आहे तो छंद त्यांचा पूर्ण होतो की छंद हा छंदच राहतो हे निकाला दिवशी स्पष्ट होणार आहे. मात्र कधी नव्हे एवढी अपक्ष उमेदवारांची भाऊ गर्दी केज विधानसभा मतदारसंघांमध्येच नव्हे तर संपूर्ण राज्यामध्ये दिसून येत आहे.