#Election
मा. आ. संगिता ठोंबरे यांनी केली होती ”या” कामासाठी निधीची मागणी…..!

केज दि.३ – विधानसभा मतदारसंघातील काही प्रमुख उमेदवार प्रचारादरम्यान आपण केलेली कामे, प्रयत्न आणि पुढे काय योजना आहेत याबद्दल मतदारांशी संवाद साधताना व्यक्त करू लागलेले आहेत.
केज विधानसभा मतदारसंघांमध्ये माजी आमदार संगीता ठोंबरे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून रणसिंग फुंकले आहे. आणि त्यांच्या प्रचाराला मोठ्या प्रमाणावर सुरुवात झाली आहे. गावागावांमध्ये ठोंबरे यांचे कार्यकर्ते मागच्या आमदारकीच्या काळामध्ये संगीता ठोंबरे यांनी केज विधानसभा मतदारसंघासाठी कोणत्या योजना राबवल्या आहेत, आणि कोणत्या योजनेसाठी प्रयत्न केलेले आहेत ज्या की त्यांच्या आमदारकीच्या नंतर केज विधानसभा मतदारसंघांमध्ये मंजूर होऊन आलेल्या आहेत. यामध्ये केज तालुक्यातील मांजरा धरण परिसरामध्ये मुकुंदराज उद्यानाचा विकास हा नाथसागर धरणाच्या बाजूला पैठण येथे जसे ज्ञानेश्वर उद्यान आहे त्याप्रमाणे व्हावा अशी मागणी माजी आमदार संगीता ठोंबरे यांनी 30 मार्च 2017 मध्ये म्हणजेच सात वर्षांपूर्वी केली होती. कारण परिसरातील सर्वात मोठे धरण म्हणून मांजरा धरणाकडे पाहिले जाते आणि मांजरा धरणाच्या परिसरामध्ये विस्तीर्ण अशा प्रकारचा परिसर आहे. त्यामुळे त्या ठिकाणी जर पैठणच्या धर्तीवर उद्यान उभारण्यात आले तर पर्यटनाला मोठी चालना मिळेल. आणि तालुक्याच्या संपन्नतेमध्ये आणि महसुलामध्ये सुद्धा मोठी वाढ होईल. या उद्देशाने ठोंबरे यांनी सदरील उद्यानाचा विकास व्हावा यासाठी निधीची तरतूद सुद्धा एका पत्राद्वारे केलेली आहे.
दरम्यान, ही आणि अशाच प्रकारची जी काही कामे आहेत किंवा ज्या मागण्या आहेत त्या मागण्या सध्या प्रचारादरम्यान संगीता ठोंबरे मतदारांसमोर मांडताना दिसून येत असून मतदारही यावर विचार करत आहेत.