#Election
देवस्थानांच्या ठिकाणी विकास करण्याची संधी मिळाली हे माझं भाग्य समजते…..!
केज दि.४ – मागच्या कित्येक वर्षांपासून केज तालुक्यासह इतर भागातील येणाऱ्या भाविक भक्तांची सोय व्हावी या हेतूने तालुक्यातील वरपगाव येथील शिवरामपुरी मठ संस्थान येथे एक कोटी रुपये खर्च करून बांधण्यात येत असलेल्या सभा मंडपाचा लाभ हा आता भाविक भक्तांना मिळणार असून मोठ्या प्रमाणावर गैरसोयही थांबणार आहे. असे मत आमदार नमिता मुंदडा यांनी व्यक्त केले.
केज विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचला असून विद्यमान आमदार नमिता मुंदडा गावागावात जाऊन विकास कामांच्या जोरावर मतदान करण्याचे आवाहन करत आहेत. तालुक्यातील शिवराम पुरी मठ संस्थान आहे. अनेक भाविक भक्तांचे श्रद्धास्थान असून मोठ्या प्रमाणावर भाविक त्या ठिकाणी दर्शनासाठी आणि अन्य धार्मिक कार्यक्रम साठी येत असतात. मात्र मागच्या अनेक वर्षांपासून त्या ठिकाणी येणाऱ्या भाविक भक्तांसाठी हक्काचा असं निवासस्थान किंवा निवारा नव्हता. आणि याबाबत आमदार नमिता मुंदडा यांच्याकडे शिवरामपुरी मठ संस्थान येथे सभागृहाची मागणी केली आणि मुंदडा यांनीही तात्काळ पाठपुरावा करून मठ संस्थान साठी पर्यटन विकास निधी अंतर्गत एक कोटी रुपयाचा निधी उपलब्ध केला आणि सभागृहाचे कामही प्रगतीपथावर आहे. सुमारे 80 बाय 160 चौरस फुटामध्ये हे बांधकाम होत असून एकाच वेळी तीन हजार लोक त्या ठिकाणी बसतील अशी सोय झाली आहे. अशा सभागृहासाठी हा निधी उपलब्ध करून दिला आणि बांधकाम ही आता प्रगतीपथावर आहे. त्यामुळे अशा विकास कामांच्या जोरावर नमिता मुंदडा गावागावात जाऊन मतदान करण्याचे आवाहन करत आहेत आणि त्यांच्या आवाहनाला चांगल्या प्रकारे प्रतिसादही मिळत आहे.