#Election

केज विधानसभेच्या आखाड्यात उरले 26 उमेदवार….!

7 / 100
केज दि.४ – विधानसभा मतदारसंघांमध्ये अनेक नाट्यमय घडामोडीनंतर आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी 43 पैकी सतरा उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आल्याने आता निवडणुकीच्या रिंगणामध्ये 26 उमेदवार राहिले आहेत.
                    केज विधानसभा मतदारसंघाची निवडणूक ही आता स्पष्ट उमेदवारांच्या यादीत आली आहे. केज विधानसभा मतदारसंघासाठी एकूण 47 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. मात्र यामध्ये चार अर्ज अवैध ठरल्याने 43 उमेदवारी अर्ज उर्वरित होते. परंतु उर्वरित 43 पैकी 17 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज माघारी घेतल्याने आता केवळ 26 उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये माजी आमदार संगीता ठोंबरे, नगराध्यक्ष सीता बनसोड यांच्यासह अन्य काही उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत.                   दरम्यान, उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर आता जे 26 उमेदवार रिंगणात आहे त्यामध्ये भाजपच्या नमिता मुंदडा, राशपचे पृथ्वीराज साठे, मनसेचे रमेश गालफाडे हे प्रमुख उमेदवार निवडणूक लढवत आहेत. आणि आता लढतही तिरंगी होण्याचे स्पष्ट झाले आहे. यामध्ये कोण बाजी मारणार ? मनोज जरांगे पाटील यांनी निवडणूक न लढवण्याचा घेतलेला निर्णय कुणाच्या पथ्यावर पडणार हे निकालाअंती स्पष्ट होईल. मात्र संगिता ठोंबरे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेऊन पृथ्वीराज साठे यांना जाहीर पाठिंबा दिल्याने त्याचा कितपत फायदा साठे यांना होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर सीता बनसोडे यांनी अद्याप आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही
यांनी घेतले उमेदवारी अर्ज मागे….!
1. ज्ञानेश्वर लक्ष्मण कांबळे, 2. विशाल नवनाथ मस्के, 3. काळुंके विकास रामभाऊ, 4. मधुकर दगडू काळे, 5. बालाजी मुकुंद ओठले, 6. राम धर्मराज जोगदंड, 7. सिद्धार्थ श्रीरंग शिनगारे, 8. शिंदे राहुल अंगद, 9. काशिनाथ विश्वनाथ साबणे, 10. दिपाली भारत हांगे, 11. जाधव मनिषा गोकुळ, 12. संगीता विजयप्रकाश ठोंबरे, 13. सीता प्रदिप बनसोड, 14. शैलेंद्र सुदाम पोटभरे, 15. बळीराम शंकरराव सोनवणे,16. सतिश विठ्ठल वाघमारे,17. सपना सुभाष सुरवसे.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close