#Crime
केज शहरातून सराईत गुन्हेगार घेतला ताब्यात….!
केज दि.७ – सध्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा अलर्ट मोडवर आहे. कुठेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस डोळ्यात तेल घालून लक्ष देऊन आहेत. गुन्हेगार प्रवृत्तीच्या व्यक्तींवर करडी नजर आहे. आणि याचाच एक भाग म्हणून केज पोलिसांनी गावठी पिस्तुल बाळगणारा एक सराईत गुन्हेगार ताब्यात घेतला आहे.
अधिक माहिती अशी की, दिनांक 07/11/2024 रोजी पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांना गुप्त बातमीदारां मार्फत माहिती मिळाली की, जुबेर मुस्ताक फारोखी याचे जवळ गावठी कट्टा असुन तो त्याचा धाक दाखवुन रोजा मोहल्ला भागात दहशत माजवत आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांनी पोलीस स्टाफला सोबत घेवुन रोजा मोहल्ला येथे गेले असता पोलीसांना पाहुन जुबेर मुस्ताक फारोखी पळु लागला तेंव्हा पोलीसांनी त्याचा पाठलाग करुन त्यास बसस्टँडच्या मागे पकडले. त्याचे अंगझडती मध्ये त्याचे कमरेला एक सिल्वर रंगाचा देशी बनावटीचा गावठी कट्टा, त्याचे मॅगझीन मध्ये 01 जिवंत काडतुस मिळुन आल्याने जुबेर मुस्ताक फारोखी, वय 27 वर्षे, रा. रोजा मोहल्ला केज, ता केज याचे विरुध्द पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांनी दिलेल्या फिर्यादी वरुन आर्म अॅक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कार्यवाही ही अविनाश बारगळ, पोलीस अधीक्षक, बीड, चेतना तिडके, अपर पोलीस अधीक्षक अंबाजोगाई यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस अधीक्षक कमलेश मीना यांचे आदेशान्वये पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन, पोलीस उपनिरीक्षक आनंद शिंदे, पोह/बाळासाहेब अहंकारे, पोअं/ प्रकाश मुंडे यांचे पथकाने केली आहे. सदर आरोपीवर यापुर्वी सुध्दा पोलीस स्टेशन केज येथे बरेच गुन्हे दाखल आहेत. सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक हे करीत आहेत.