#Election

जबाबदारीची जाण कधीच कमी होणार नाही…..!

6 / 100
केज दि.८ – विधानसभा मतदार संघाचे मनसेचे उमेदवार रमेश गालफाडे यांनी मतदार संघात प्रचाराचा धडाका सुरू केला आहे. त्यांच्या सामाजिक कार्याच्या जोरावर ते मतदारांना प्रतिनिधित्व करण्याची संधी देण्याचे आवाहन करत आहेत. आणि याच अनुषंगाने रमेश गालफाडे यांनी निवडून आल्यानंतर काय काय करणार याचा गोषवारा जाहिरनाम्याच्या माध्यमातून मतदारांपुढे मांडला आहे.
             रमेश गालफाडे यांनी जो जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे त्यात, केज व अंबाजोगाई तालुक्यातील तरुणांना एमआयडीसीच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी प्रयत्न करणार, अंबाजोगाई जिल्हा निर्मितीसाठी प्रथम प्राधान्य देणार, बुट्टेनाथ साठवण तलावाचा प्रश्न मार्गी लावणार, लोखंडी सावरगाव येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक उभारणार. तसेच  सोयाबीन प्रोसेसिंग युनिट उभे करणार, प्रत्येक पिकाला हमी भाव मिळवुन देण्यासाठी प्रयत्न करणार, शेतकऱ्याच्या सर्व योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी
आमदार आपल्या दारी उपक्रम राबवणार, पिक विमा खात्रीशीर कंपनी कडुन घेणार, दवाखाण्यातील सर्व आरोग्य सुविधा गटबाजी न करता सर्वांना विना विलंब मिळवुन देऊ, सुशिक्षीत बेरोजगार तरुणांसाठी रोजगार मेळावा प्रत्येक ६ महिण्याला घेणार, महिला सुरक्षा धोरण प्रभावी राबवणार.
           यासह महिला बचतगटांना उद्योग निर्मितीसाठी शासकिय योजनेतुन भरीव मदत करणार, श्रावणबाळ, संजव गांधी योजनेचे फॉर्म गावोगावी जावुन योजनेचा लाभ मिळवुन देणार, आजी-आजोबा मदत घरकुल योजना, जलसिंचन विहीर योजना व फळबाग योजना प्रभावी पणे अंमलात आणणार, एम.पी.एस.सी, यु.पी.एस.सी केंद्र उभा करणार, अभ्यास केंद्र उभा करणार. त्याच बरोबर दुर्लभ घटकांतील विद्यार्थ्यांना शिक्षणा पासुन वंचित राहू देणार नाही, केज व अंबाजोगाई येथे पत्रकार बांधवांसाठी भव्य पत्रकार भवन उभारणार असा सर्वसमावेशक वाचननामा जनतेसमोर मांडला आहे.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close