#Election
माळी समाजाच्या 33 उमेदवारांना महात्मा फुले युवा दलाचा पाठींबा….!
बीड दि.८ – राज्यातील माळी समाजातील 33 उमेदवारांना महात्मा फुले युवा दलाच्या वतीने जाहीर पाठिंबा देत असल्याची घोषणा महात्मा फुले युवा दलाचे संस्थापक प्रमुख ॲड सतिष शिंदे यांनी बीड येथे पत्रकार परिषदेत बोलताना केली.
यावेळी बोलताना शिंदे म्हणाले की जो समाजाच्या हिताचे काम करील त्याच्या पाठीशी महात्मा फुले युवा दल राहील. महायुती सरकारमधील मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी समाजाचा सन्मान केला.माळी समाजाचे श्रद्धास्थान असलेले श्रीक्षेत्र संत शिरोमणी सावता महाराज यांची संजीवनी समाधी अरण ला अ तीर्थक्षेत्राचा व विविध विकास कामासाठी निधी महायुती सरकारने दिला तसेच महात्मा ज्योतिराव फुले व सावित्रीमाई फुले यांनी पुणे येथील पहिली मुलींची शाळा ज्या भिडे वाड्यात केली त्या भिडे वाड्याला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा दिला ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले यांचे जन्म गाव असलेले नायगाव येथे विविध विकास कामे केली मोठा निधी देऊन त्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे . समाजाचे कर्तव्य आहे. चांगल्या काम करणाऱ्यांना आपला पाठिंबा असावा अशी आमची भूमिका आहे .त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्यासह राज्यातील या १) मा छगनराव भुजबळ (राष्ट्रवादी अजित पवार )
विधानसभा : येवला (नाशिक )
२) मा अतुलभाऊ सावे (भाजपा )
विधानसभा :छत्रपती संभाजी नगर (पूर्व )
३) मा जयकुमार गोरे (भाजपा )
विधानसभा: मान खटाव (सातारा )
४) मा चंदूभाऊ यावलकर (भाजपा )
विधानसभा:मोर्शी वरुड (अमरावती )
५) सौ.देवयानी फ़रांदे (भाजपा)
विधानसभा: नाशिक मध्य ( नाशिक)
६) सौ मनिषाताई चौधरी (भाजपा)
विधानसभा: दहिसर (मुंबई )
७) मा.आमदार बळीराम भाऊ सिरस्कार (शिवसेना शिंदे गट )
विधानसभा : बाळापुर (अकोला )
८)मा वसंत भाऊ गिते (शिवसेना उद्धव ठाकरे )
विधानसभा: नाशिक (पश्चिम)
९)मा अजय चौधरी (शिवसेना उद्धव ठाकरे )
विधानसभा : शिवडी (मुंबई )
१०) मा सिध्दराम म्हेत्रे ( काँग्रेस )
विधानसभा: अक्कलकोट(सोलापूर )
११) मा महेश गणगणे (काँग्रेस )
विधानसभा : अकोट (अकोला )
१२) डॉ स्वातीताई वाकेकर (काँग्रेस )
विधानसभा : जळगाव जामोद (बुलडाणा )
१३) सौ अश्विनी ननवरे-कदम (शरद पवार राष्ट्रवादी )
विधानसभा: पर्वती (पुणे )
१४) मा.आ.श्री भिमराव धोंडे ((अपक्ष)
विधानसभा : आष्टी (बीड )
१५) मा खा.श्री समीरभाऊ भुजबळ (अपक्ष )
विधानसभा : नांदगाव (नाशिक )
१६) श्री परशुराम माळी (शेतकरी संघटना )
विधानसभा : पलूस कडेगाव (सांगली )
१७ )श्री.श्रीहरी (तानाजी) माळी (राष्ट्रीय समाज पक्ष)
विधानसभा: धाराशीव
१८) श्री प्रकाशजी दिलवाले (राष्ट्रीय समाज पक्ष)
विधानसभा :पैठण (छ.संभाजीनगर )
१९) श्री रामप्रसाद थोरात (वंचीत)
विधानसभा : परतूर आष्टी (परभणी )
२०) श्री शाम गोरे (राष्ट्रीय समाज पक्ष)
विधानसभा : औसा (लातूर)
२१) सौ. संगीता अशोक बनकर (बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी ) विधानसभा:बल्लारपूर (चंद्रपूर )
२२) श्री अण्णा साहेब शेलार (अपक्ष )
विधानसभा : श्रीगोंदा
२३) श्री प्रदिप साहेबराव मानकर (वंचित)
विधानसभा : अचलपुर (अमरावती )
२४) श्री किशोर जेजुरकर (वंचित)
विधानसभा :वैजापूर (छ संभाजीनगर )
२५) डॉ अभिलाषाताई गावतुरे (अपक्ष)
विधानसभा : बल्लारपूर (चंद्रपूर )
२६) श्री विजय ढाकुलकर (अपक्ष )
विधानसभा :अमरावती
२७) श्री हिलाल आण्णा माळी (अपक्ष)
विधानसभा : धुळे ग्रामीण
२८) डॉ उत्तमराव महाजन (अपक्ष )
विधानसभा: भडगाव पाचोरा (जळगाव )
२९) श्री भगवानभाऊ महाजन (अपक्ष)
विधानसभा : पारोळा-एरडोल (जळगाव )
३०) श्री अविनाश फरांदे (अपक्ष ) विधानसभा : वाई (सातारा )
३१) ऍड मंगेश ससाणे (अपक्ष )
विधानसभा : हडपसर (पुणे )
३२) प्रा संदानदजी माळी (अपक्ष)
विधानसभा : बुलढाणा
३३) श्री संजय बागुल (अपक्ष )
विधानसभा :चांदवड (नाशिक )
माळी समाजातील 33 उमेदवारांना यामध्ये अपक्ष आणि इतर पक्षातील सर्व उमेदवारांना पाठिंबा जाहीर देत असल्याची घोषणा ॲड सतिष शिंदे यांनी या पत्रकार परिषदेत केली. यावेळी महात्मा फुले युवा दल जिल्हा प्रमुख अजय शिंदे, विद्यार्थी आघाडीचे जिल्हाप्रमुख पंकज साळुंके, उपजिल्हाप्रमुख संजय काळे, बीड तालुकाप्रमुख विठ्ठल साळुंके यांच्यासह मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते.
दरम्यान, इतर विधानसभा पाठिंबासंदर्भात ज्या त्या जिल्हाप्रमुखांनी,तालुकाप्रमुख व इतर पदाधिकारी यांनी लवकरच आपण आपल्या स्तरावर पाठिंबा जाहीर करावा.