#Crime

आजारी पतीस पत्नीच्या नातेवाईकांची मारहाण…..! 

6 / 100
केज दि.८ – कानडीमाळी (ता. केज) येथील भागवत रामभाऊ राऊत (वय ३५) हे केज शहरात वास्तव्यास असून झेरॉक्स दुकान चालवितात. त्यांची पत्नी ही मुलाबाळासह भाऊबीजेला माहेरी गेली. ती अचानक पहाटे ४.३० वाजता घरी आल्याने त्यांनी तुला कोणी आणून सोडले अशी विचारणा केली. मात्र तिने काही उत्तर दिले नाही. त्यानंतर ते ६ वाजेच्या सुमारास वसंत विद्यालयाच्या मैदानावर व्यायाम करीत असताना त्यांच्या पत्नीचे चुलत भाऊ भागवत बालाजी गोरे, कृष्णा बालाजी गोरे, अजीत जगन्नाथ गोरे, पुजा जगन्नाथ गोरे (सर्व रा. बनसारोळा) यांनी येऊन आमच्या बहिणीस विनाकारण त्रास का देतोस, तुझ्या भावाच्या मुलांना सांभाळायला आमच्या बहिणीला त्रास होतो. अशी भांडणाची कुरापत काढून शिवीगाळ करीत काठीने व लाथाबुक्यांनी मारहाण केली. जीवे मारण्याची धमकीही दिली. अशी तक्रार भागवत राऊत यांनी दिल्यावरून भागवत गोरे, कृष्णा गोरे, अजीत गोरे, पुजा गोरे या चौघांविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close