रमेश आडसकरांच्या रुपात माजलगाव मतदारसंघाला मिळणार तरुण कार्यक्षम आमदार – जगदीश फरताडे
माजलगाव दि.8 – माजलगाव मतदासंघांचे प्रश्न गेल्या अनेक दशकांपासून प्रलंबित अवस्थेत आहेत या जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी कार्यक्षम लोकप्रतिनिधी सभागृहात जायला हवा परंतु दुर्दैवाने लोकप्रतिधींनी दुर्लक्ष केल्याचे मतदारसंघ विकासाच्या बाबतीत कोसो दूर राहिला परंतु रमेशआडसकरांच्या माध्यमातून मतदारसंघातील प्रश्न सुटण्यासाठी जनतेला चांगली संधी प्राप्त झाल्याचे मत युवा नेते जगदीश फरताडे यांनी व्यक्त केले.
आज देवडी ता वडवणी येथे शेतकरी व मराठा यांच्या आंदोलनाच्या माध्यमातून राज्यभर प्रसिध्द झालेले युवा नेते जगदीश फरताडे यांनी अपक्ष उमेदवार रमेश आडसकर यांनी त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यां समवेत पाठिंबा दिला या प्रसंगी रमेश आडसकरांनी त्यांचे स्वागत करुन भविष्यात पाठींबा देणाऱ्या या तरुणांना योग्य न्याय देणार असल्याचे सांगितले या वेळी पाठींबा देणाऱ्या जगदीश फरताडे यांनी मनोगत व्यक्त करताना मराठा आरक्षण आंदोलनात आलेले अनुभव विषद करुन या आंदोलना प्रसंगी रमेश आडसकरांनी कसे सहकार्य केले हे सांगितले तसेच माजलगाव मतदारसंघांत होणाऱ्या निवडणूकीत जेवढे उमेदवार आहेत त्या पैकी रमेश आडसकर हे उजवे असून त्यांच्या माध्यमातून मतदारसंघांतील प्रश्न सुटणार आहेत, आज मतदारसंघाला ऊर्जा व कार्यक्षमता असलेल्या उमेदवाराची गरज असून रमेश आडसकरांच्या रुपात माजलगावं मतदारसंघांला धडाडीचा आमदार लाभणार असल्याचेही त्यांनी या प्रसंगी सांगितले.या वेळी राजभाऊ अण्णा बादाडे, सावळाराम उबाळे, गजानन शिंदे, माऊली आगे, बाळकृष्ण शिंदे, भागवत शिंदे, अजय लंगडे, बालासाहेब शेंडगे, अंकुशराव गोंडे, सोनाजी गोंडे, प्रकाश अण्णा झाटे, महादेव आगे, गीतेश आगे, प्रदीप निपटे, सारंग खरात, विजय शेंडगे, डॉ. विशाल शिंदे, पवन साबळे, जनार्दन शिंदे, पांडुरंग पवार, अंगद शिंदे, गोकुळ उबाळे, सचिन मायराणे, बंडू बापू सावंत, प्रदीप निपटे, बबलू मस्के, अमर मस्के, डॉ.विठ्ठल घुगे यांच्या सह शेकडो कार्यकर्त्यांची व नागरिकांची उपस्थिती होती.