#Election
नमिता मुंदडा यांना जास्तीतजास्त लिडने निवडून आणू….!

केज दि.१४ – दलित आन्याय अत्याचार निर्मुलन समितीच्या माध्यमातून केज शहर तथा तालुक्यात कार्य करून सामाजिक कार्यात अग्रस्थानी असणारे दलित नेते अशोक गायकवाड यांनी महायुतीच्या उमेदवार नमिता मुंदडा यांना बिनशर्त पाठिबा दिला आहे.
केज शहरातील फुले नगर येथील वार्ड क्रमांक 7,8,9 येथुन आपल्या सामाजिक कार्याच्या माध्यमातून केज शहर तालुक्यात आपल्या कार्याचा ठसा उमटवत तसेच दलित आन्याय आत्याचार निर्मुलन समिती केजच्या माध्यमातून केज शहर तथा तालुक्यातील विविध स्वरूपांच्या दलितांच्या समस्या सोडविण्याचे कार्य करणारे अशोक गायकवाड यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्या समवेत फुले नगर येथील एलएफसी चौक येथे केज तालुक्याचे जेष्ट सामाजीक कार्यकर्ते नंदकिशोर मुंदडा यांचे जोरदार स्वागत करून भाजपाच्या केज विधानसभेच्या आमदार नमिता मुंदडा यांना पाठींबा दिला.
यावेळी नमिता मुंदडा यांना फुलेनगर वार्ड क्रमांक 7, 8 व 9 मधुन जास्तीत जास्त लिड देऊन निवडून आणू असे अभिवचन दलित नेते अशोक गायकवाड यांनी दिले. यावेळी फुलेनगर मधील तथा हाऊसीग कॉलनी वार्ड क्र.7,8,9 मधील असंख्य तरुण, वृद्ध, महिला उपस्थित होत्या.