आपला जिल्हा
कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याला विनाकारण टार्गेट करू नका – सक्रीय पत्रकार संघ , भाजपचा इशारा
संभाजी ब्रिगेड ही देणार निवेदन
केज दि.27 – मागच्या पंधरा दिवसांपासून कांही विशिष्ट पक्षाचे पदाधिकारी केजचे नायब तहसीलदार सचिन देशपांडे यांना वैयक्तीक कारणातून टार्गेट करून त्यांच्या बदलीची मागणी करत आहेत. मात्र सचिन देशपांडे हे अतिशय कर्तव्यदक्ष व सर्वसामान्य माणसांचे तात्काळ कामे करणारे अधिकारी असून त्यांची बदली करण्यात येऊ नये. तसेच त्यांना विनाकारण टार्गेट करू नका अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा सक्रीय पत्रकार संघ तसेच केज तालुका भाजपच्या वतीने देण्यात आला आहे.
केज तहसील मध्ये सचिन देशपांडे हे नायब तहसिलदार म्हणून कार्यरत आहेत. सर्वसामान्य लोकांची कामे तात्काळ करण्यासाठी त्यांची ओळख आहे. कुठल्याच प्रकारची अडवणूक त्यांच्याकडून होत नाही. मात्र असे असतानाही कांही विशिष्ट पक्ष व संघटनेचे कांही ठराविक लोक वैयक्तीक कारणातून टार्गेट करून त्यांच्या बदलीची मागणी करत आहेत. मात्र सचिन देशपांडे यांच्या समर्थनार्थ सक्रीय पत्रकार संघ तसेच केज भाजपा पुढे आले असून त्यांची बदली न करण्याची मागणी करण्याचे निवेदन तहसीलदार यांना दिले आहे. तसेच त्यांची बदली झाली तर आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे. पत्रकार संघाच्या निवेदनावर सक्रीय पत्रकार संघाचे अध्यक्ष संतोष सोनवणे, विनोद शिंदे, अभय कुलकर्णी, डी. डी. बनसोडे, रामदास साबळे, मझर शेख, श्रावण जाधव, हनुमंत सौदागर,इक्बाल शेख, सय्यद माजेद, रामदास तपसे, मधुकर सिरसट, दिपक नाईकवाडे, सचिन उजगरे, सोमनाथ लामतुरे यांच्या तर भाजपच्या निवेदनावर भाजप तालुकाध्यक्ष भगवान केदार, दत्ता धस, श्रीकांत भांगे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
दरम्यान संभाजी ब्रिगेड चे तालुकाध्यक्ष राहुल खोडसे यांनीही सचिन देशपांडे यांची बदली करण्यात येऊ नये अशी भूमिका घेत पाठिंबा दर्शवला आहे.