#Election
जनतेची सेवा करण्याची संधी द्या – पृथ्वीराज साठे
केज दि.१९ – विधानसभा मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेला आतापर्यंत केवळ आश्वासने आणि भूलथापांशिवाय काहीही मिळालेले नाही. मी अतिशय सर्वसामान्य कुटुंबातून आलेलो असल्याने मला सर्वसामान्यांच्या प्रश्नांची जाण आहे. मला कुठल्या पदाची लालसा नाही परंतु खऱ्या अर्थाने जनतेची सेवा करण्यासाठी मला प्रतिनिधीत्व करण्याची इच्छा असून मी दिलेला शब्द पूर्ण करून केज विधानसभा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी झगडत आहे. त्यामुळे मला जनतेचा सेवक म्हणून प्रतिनिधित्व करण्याची संधी मतदारांनी द्यावी असे आवाहन महाविकास आघाडी राशपचे उमेदवार पृथ्वीराज साठे यांनी केले आहे.