#Election

केज विधानसभा राखण्यात नमिता मुंदडा यशस्वी.…!

12 / 100

केज दि.२३ –  केज विधानसभा मतदार संघाचा अंतिम निकाल घोषित करण्यात आला असून भाजप महायुतीच्या विद्यमान आमदार नमिता मुंदडा यांना 2687 विजयी घोषित करण्यात आले आहे. पृथ्वीराज साठे यांनी शेवटपर्यंत झुंज दिली परंतु विजयी गुलाल मात्र नमिता मुंदडा यांनी उधळला. प्रचारा दरम्यान अनेकांनी मोठमोठे दावे केले होते. मात्र ते सर्वच्या सर्व मतदारांनी खोडुन काढत राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत दिले असून विरोधी पक्षाला विरोधी पक्ष नेता ही नेमता येतो की नाही ? अशी शंका निर्माण झाली आहे.

          दरम्यान, जिल्ह्यात बीड – संदीप क्षीरसागर (राशप), आष्टी – सुरेश धस (भाजप), माजलगाव – प्रकाश सोळंके (राष्ट्रवादी अजित पवार), परळी – धनंजय मुंडे (राष्ट्रवादी अजित पवार) गेवराई – विजयसिंह पंडित (राष्ट्रवादी अजित पवार) तर केजमधून नमिता मुंदडा (भाजप) निवडून दिल्याने भाजप 2, राष्ट्रवादी (अ. प.) 3 तर राशप 1 असे 6 आमदार निवडून आले आहेत.

अंतिम आकडेवारी 

1) नमिता मुंदडा : 117081

2) पृथ्वीराज साठे : 114394

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close