महाराष्ट्र
अखेर एकनाथ शिंदेंनी सोडले मौन…!
मुंबई दि.५ – एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) शपथविधीचे पत्र राज्यपालांना दिले आहे. यामुळे एकनाथ शिंदे यांच्या उपमुख्यमंत्रीपदाचा सस्पेन्स संपला आहे. ”एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील”, असे शिवसेना नेते उदय सामंत यांनी सांगितले.
महायुती सरकारचा महाशपथविधी सोहळा आज गुरुवारी आझाद मैदानावर 5.30 वा. होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचाच शपथविधी होणार आहे. आज सायंकाळी होत असलेल्या या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उपस्थित असतील. भाजपशासीतसह एनडीएचे सरकार असलेल्या राज्यांतील मुख्यमंत्र्यांची या शपथविधी सोहळ्यासाठी उपस्थित असेल.