क्राइम
24 तासांत 2 कोटी 21 लाखांच्या मुद्देमालासह एकास घेतले ताब्यात……!
धाराशिव दि.१९ – नळदुर्ग ते तुळजापूर रोडवर चालती ट्रक अडवून सुमारे दोन कोटी 21 लाखांचा मुद्देमाल लुटून पोबारा पाच जणांनी पोबारा केला. मात्र पोलिसांनी अवघ्या चोवीस तासात मुद्देमालासह एकाला ताब्यात घेतले असून उर्वरित दरोडेखोरांचा शोध सुरू आहे.
दुबलगुंडी, ता.हुमनाबाद, जि. बिदर राज्य- कर्नाटक येथील- देवेंद्र रेवणप्पा शेडुळे, वय 40 वर्षे, हे ट्रक क्र. ए. पी. 56-4380 ही चालवत हैद्राबाद ते शिलवासा असा प्रवास करत असताना दि. 17.12.2024 रोजी 17.00 वा. सु. तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग ते तुळजापूर जाणारे रोडवर गंधोरा पाटीच्या पुढे आले असता पाच अनोळखी इसमांनी देवेद्र शेडुळे यांचा नमूद ट्रक थांबवून,आम्ही फायनान्स वाले आहोत तुमच्या ट्रकचे दोन हाफ्ते भरायचे बाकी आहेत असे त्यांना म्हणाले. यावर देवेंद्र शेडुळे यांनी आपला ट्रक रस्त्याबाजूस थांबवला असता एका अनोळखी इसमांसह अन्य चार इसमांनी देवेंद्र शेडुळे व त्यांचा भाच्चा यांना लाथाबुक्यांनी मारहाण करुन बळजबरीने त्यांचे कार मध्ये बसवून चाकुचा धाक दाखवून देवेंद्र शेडुळे यांची ट्रक क्र. ए. पी. 56-4380, कॉप्रचे रॉड 24 टन 770 किलो वजनाचा व तीन मोबाईल फोन असे बळजबरीने घेवून तेथून पसार झाले. यावर देवेंद्र शेडुळे यांनी नळदुर्ग पोलीस ठाणे गाठून गुन्हा क्र. 480/2024 हा भा.न्या.सं. कलम- 310(2), 126(2) हा गुन्हा रात्री 05.17 वा. सु. नोंदवला आहे.
गुन्हा तपासादरम्यान पोलीस अधीक्षक संजय जाधव व मा. अपर पोलीस अधीक्षक गौहर हसन यांच्या मार्गदर्शनाखाली नळदुर्ग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र सरोदे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे, सपोनि सुदर्शन कासार,सचिन खटके, अमोल मोरे, नळदुर्ग पोलीस ठाण्याचे सपोनि- आनंद कांगुणे, पोउपनि- संतोष गिते, पोकॉ-अविनाश दांडेकर, बालाजी शिंदे, सुर्यकांत फुलसुंदर, यांसह स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हावलदार-शौकत पठाण, फराहाण पठाण, जावेद काझी, विनोद जानराव, समाधान वाघमारे, अमोल निबांळकर, पोलीस नाईक-बबन जाधवर, नितीन जाधवर पोकॉ- योगेश कोळी, चालक हावलदार विजय घुगे, पोकॉ शिंदे, यांच्या पथकाने गुन्ह्याच्या कार्यपध्दीच्या व मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे नमूद गुन्ह्यातील आरोपी- 1)इरफान जाकीर शेख, वय 27 वर्षे, रा. पंतगे रोड काळा मठ उमरगा ता. उमरगा जि. धाराशिव यास दि. 18.12.2024 रोजी लातुर रोड उमरगा चौरस्ता येथुन ताब्यात घेवून लुटीतील नमुद ट्रक, 24 टन 770 किलो वजनाचा कॉपरचा माल असा एकुण 2,21,31,871 ₹ जप्त केले आहेत. गुन्ह्यातील त्यांच्या उर्वरीत साथीदारांचा पोलीस शोध घेत आहेत.