सर्वपक्षीय मोर्चात बहुसंख्येने सहभागी व्हावे – राहुल सोनवणे…!
बीड दि.२६ – केज तालुक्यातील मस्साजोगचे युवा सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून निर्घृणपणे हत्या करण्यात आली. मात्र आणखीही कांही आरोपी मोकाट फिरत आहेत. त्यामुळे संतोष देशमुख यांना न्याय मिळण्यासाठी व त्यांच्या मारेकऱ्यांना तात्काळ अटक करण्यासाठी सर्वपक्षीय मोर्चा (दि.२८) डिसेंबर रोजी आयोजित केला आहे. या मोर्चामध्ये जिल्ह्यातील बहुसंख्य नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन बीड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राहुल सोनवणे यांनी केले आहे.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या मुख्य सूत्रधाराला तुरुंगात टाकावे, यातील मुख्य मास्टरमाईंडला तात्काळ अटक करावे या मागणीसाठी शनिवारी (दि.२८) डिसेंबर रोजी सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यामध्ये बीड जिल्ह्यातून हजारो नागरिक मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत. सरकार आणि पोलीस प्रशासनाने तात्काळ कृती करून मारेकऱ्यांना ताब्यात घ्यावे.तसेच सदरील खटला जलदगती न्यायालयात चालवून दोषींना फासावर लटकावे या व इतर मागण्यांसाठी मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून जिल्ह्यातील बहुसंख्य नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन राहुल सोनवणे यांनी केले आहे.