आपला जिल्हा
समाज माध्यमावर आक्षेपार्ह पोस्ट करू नका…..!
![समाज माध्यमावर आक्षेपार्ह पोस्ट करू नका…..! समाज माध्यमावर आक्षेपार्ह पोस्ट करू नका…..!](https://i0.wp.com/sakriynews.in/wp-content/uploads/2024/12/IMG_20241221_123433.jpg?resize=780%2C470&ssl=1)
बीड दि.२९ – जिल्ह्यातील नागरिकांनी आपल्या जवळील वैध अथवा अवैध शस्त्रांचे प्रदर्शन आणि भीती निर्माण करणाऱ्या पोस्ट सोशल मीडिया अकाउंट वरून करू नयेत असे आदेश नूतन पोलीस अधीक्षकांनी दिले आहेत.
नव्यानेच पदभार घेतलेले पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी याबाबत अत्यंत कठोर भूमिका घेतलेली आहे.
कोणत्याही व्यक्तीने मोबाईल किंवा इंटरनेट वरून आपल्या जवळील वैध किंवा अवैध असलेले शस्त्राचे प्रदर्शन, सोशल मीडियावर फोटो अथवा व्हिडिओ त्याचबरोबर एखाद्या मारामारीच्या घटनेचे चित्रीकरण, फोटो सोशल मीडिया, व्हाट्सअप द्वारे करून समाजामध्ये भीती पसरवण्याचे काम करू नये.तसेच ज्यांनी अशा प्रकारच्या पोस्ट यापूर्वी प्रसारित केल्या असतील त्यांनी त्या तात्काळ समाज माध्यमावरून डिलीट कराव्यात आणि यापुढे अशा प्रकारच्या पोस्ट पुढे पाठवू नयेत. अन्यथा त्यांचे विरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशी सक्त ताकीद बीड जिल्ह्याचे नव्याने पदभार स्वीकारलेले पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी दिलेली आहे. त्याचे काटेकोर पालन सर्वांनी करावे असे आवाहनही त्यांनी केले आहे.