केज दि.३ – पोलीस ठाणे हद्दीतील नांदुरघाट ओपी मधील दहिफळ वडमाऊली गावातील विशाल गदळे यास जोला गावातील काही तरुणांनी ब्लॅक स्कॉर्पिओ मधून उचलून नेले आहे अशी खबर पोलिसांना मिळल्यावरून पोलिसांनी तात्काळ सूत्रे हलवत आठ जणांना ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक 02/01/25 रोजी 11.10 वाजताचे सुमारास बीट इन्चार्ज पोलीस हवालदार आघाव यांनी माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक शिंदे सोबत दोन पोलीस टीम तयार करून पारंपारिक व आधुनिक तपासाच्या माध्यमातून आरोपींची शोध मोहीम चालू केली. दरम्यान फिर्यादी अंकुश श्रीहरी ढाकणे राहणार बरड फाटा केज यांची तक्रार नोंदवून घेतली. फिर्यादीवरून 3/25 कलम 140(1) 126(2) 118(1) 324(4) 324(5) 189(2) 191(2) 190 BNS सह 3 25 आर्म्स अॅक्ट प्रमाणे अग्नि शस्त्राचा धाक दाखवून मारहाण करून किडनॅपिंगचा गुन्हा नोंद केला. रात्री शोध घेत असताना पोलीस उपनिरीक्षक शिंदे यांचे पथक एकत्र येत सोबतच शोध सुरू केला. दरम्यान शोध घेत असताना असलेल्या टीमला नेकनूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत वाणगाव फाट्या जवळील सह्याद्री ढाब्या मध्ये पाठीमागचे बाजूला एक काळी स्कार्पिओ व त्यातील इसम स्कॉर्पिओ चे मागे बाजूस तात्पुरत्या टेंट मध्ये असल्याचे दिसून आले. त्यावेळी पोलीस उपनिरीक्षक शिंदे व त्यांच्या सोबत असलेल्या पथकास तात्काळ येण्यासाठी सांगून आरोपी पळून जाणार नाहीत अशा पद्धतीने पोलीस दबा धरून बसले. काही वेळाने दोन्ही टीम एकत्र आल्यानंतर धाड टाकून सर्व आठ आरोपी व गुन्ह्यात वापरलेली स्कॉर्पिओ ताब्यात घेतली. तर सर्व 8 आरोपीं व स्कॉर्पिओ पोलीस स्टेशन मध्ये चौकशी करिता आणण्यात आले.
दरम्यान पकडलेल्या आरोपीतांकडे चौकशी केली असता त्यातील धनराज सारूक यांनी सुद्धा त्याला व त्याच्या मित्रांना फिर्यादी व त्याच्या मित्रांनी लाठ्या काट्याने व लोखंडी रॉडने मारहाण केली आहे व त्यांनी विशाल गदळे यास किडनॅप केलेले नाही व त्यांच्याकडे अग्निशस्त्रासारखे कोणतेही हत्यार नव्हते असा जबाब दिला. त्याच्या फिर्यादीवरून 6 इसमाविरोध गुरक्र 4/25 कलम 118(1) व इतर riot कलमे BNS लावून गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. मात्र गुरक्र 3/25 मधील फिर्यादीकडे कसून चौकशी केली व आरोपी त्यांना समोरासमोर करून चौकशी केली असता सदरचा गुन्हा मारामारी व riot चा असल्याचे निष्पन्न झाल्याने गुन्ह्याचे अग्निशस्त्राबाबत लावलेले कलम कमी करण्याबाबत कोर्टाला पत्र देण्याची तजवीज करण्यात येणार असल्याची माहिती पीआय वैभव पाटील यांनी दिली.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक कावत, अपर पोलीस अधीक्षक चेतना तिडके व पोलीस उपाधीक्षक कमलेश मीना यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.