क्राइम
गावठी पिस्टल व काडतुस जप्त : दोन आरोपी केले जेरबंद…!
बीड दि.६ – पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांच्या सूचनेनुसार जिल्ह्यात अवैध धंदे करणारांच्या मुसक्या आवळल्या जात आहेत. अवैध शस्त्र बाळगणारे रडारवर आहेत.आणि त्याच अनुषंगाने अंबाजोगाई नंतर केज तालुक्यातही गावठी कट्टा बाळगणाऱ्यास जेरबंद केले आहे. दिनांक 06/01/2025 रोजी स्थागुशा बीड येथील पोह/ जफर पठाण यांना गुप्त बातमी मिळाली की, सोमनाथ राजाभाऊ चाळक रा.लहुरी ता.केज याचेकडे एक गावठी कट्टा असून तो लहुरी येथे जिल्हा परिषद शाळा जवळ थांबला आहे. अशी खात्रीलायक बातमी मिळताच सदरची खबर पो.नि. श्री. उस्मान शेख यांना देवुन त्यांनी पुढील कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश पोह पठाण यांना दिले. त्यावरुन पोह पठाण यांनी सोबत स्थागुशा स्टाफ घेवुन जात सापळा लावला व लहुरी येथुन सोमनाथ राजाभाऊ चाळक यास ताब्यात घेवुन त्याचे जवळ कमरेला एक गावठी बनावटीची पिस्टल व दोन जिवंत काडतुस ताब्यात घेतले. सदर आरोपीकडे अधिक चौकशी करता त्याने सदर गावठी पिस्टल विकास सुभाष सावंत रा.सावंतवाडी ता.केज जि.बीड याचेकडुन आणल्याचे सांगितले. त्यानंतर सुभाष सावंतचा शोध घेवुन त्यास सावंतवाडी येथुन ताब्यात घेतले आहे.
आरोपीकडुन जप्त केलेला एक गावठी बनावटीची पिस्टल व दोन जिवंत काडतुस कि.अ.42000/- रु चा मुद्देमाल व वर नमुद दोन्ही आरोपी पो.स्टे.केज यांचे ताब्यात देण्यात आले असुन त्यांचे विरुध्द पो.स्टे.केज येथे भारतीय शस्त्र अधिनियम कलम 3/25 अन्वये गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया चालु आहे. नमुद दोन्ही आरोपींनी यापुर्वी पो.स्टे.केज, वडवणी, युसुफ वडगाव, कळंब येथे पेट्रोलपंपावर कोयत्याचा धाक दाखवुन दहशत निर्माण करुन जबरी चोरीचे गुन्हे केले होते. स्थानिक गुन्हे शाखा,बीड ने या कोयता गँगचा पर्दाफाश करुन 05 जबरी चोरीचे गुन्हे उघडकीस आणले होते.
सदर आरोपींचा गुन्हे अभिलेख पाहता आरोपी विकास सुभाष सावंत रा.सावंतवाडी ता.केज याचेवर पुणे जिल्हया पो.स्टे.भारती विद्यापिठ (पुणे) येथे दरोडयाची तयारी 01, मारहाणीचा 01, पो.स्टे.सिंहगड (पुणे) येथे चोरीचा 01 व अग्निशस्त्र बाळलेला 01 गुन्हा, तसेच बीड जिल्हयात कोयत्याचा धाक दाखवुन जबरी चोरीचे 03 व धाराशिव जिल्हयात 02 असे गुन्हे दाखल आहेत. आरोपी सोमनाथ राजाभाऊ चाळक रा.लहुरी ता.केज याचे वरील बीड जिल्हयात कोयत्याचा धाक दाखवुन जबरी चोरी करणेचे 03 व धाराशिव जिल्हयात 02 गुन्हे दाखल आहेत.
सदरची कामगिरी नवनीत काँवत पोलीस अधीक्षक,बीड, सचिन पांडकर अपर पोलीस अधीक्षक बीड, पोनि उस्मान शेख स्था.गु.शा.बीड यांचे मार्गदर्शनाखाली पोह/जफर पठाण, महेश जोगदंड, तुषार गायकवाड, बप्पासाहेब घोडके , चालक गणेश मराडे यांनी केली.