आरोग्य व शिक्षण
बारावी परीक्षेची लगबग सुरू….!
बीड दि.१० – बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी-मार्चमध्ये होणाऱ्या बारावीच्या परीक्षेची प्रवेशपत्र आजपासून म्हणजेच 10 जानेवारी पासून उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
विद्यार्थ्यांना ही प्रवेशपत्र www.mahahsscboard.in या वेबसाइटवरून डाऊनलोड करता येणार आहेत. याशिवाय महाविद्यालयातून देखील प्रवेशपत्र घेता येणार आहे.
दरम्यान, प्रवेश पत्रावर प्रचार्यांचा सही शिक्का घ्यावा लागणार आहे. त्याशिवाय परीक्षेला बसता येणार नाही. तसेच या संदर्भात काही तांत्रिक अडचणी आल्यास माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा, असे आवाहन राज्य मंडळाकडून करण्यात आले आहे.