व्हायरल
कॉपी करण्यासाठी तरुणाने लढवली नामी शक्कल….!
मुंबई दि.12 – पोलीस दलातील भरतीसाठी घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये एक धक्कादायक प्रकार घडल्याचं समोर आलं आहे. लेखी परीक्षेदरम्यान उमेदवाराकडून चक्क ब्लूटूथचा वापर सुरू होता. या उमेदवाराला ब्लूटूथचा वापर करताना रंगेहाथ पकडण्यात आलं आहे. काल मुंबईत पोलीस विभागातील विविध पदांसाठी लेखी परीक्षा आयोजित करण्यात आली होती, या परीक्षेदरम्यान हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेनं खळबळ उडाली आहे.
अधिक माहिती अशी की, काल मुंबईत पोलीस विभागातील विविध पदांसाठी लेखी परीक्षा आयोजित करण्यात आली होती, यासाठी राज्यभरातून हजारो विद्यार्थी मुंबईत विविध परीक्षा केंद्रांवर परीक्षा देत होते, या परीक्षेदरम्यान हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.लेखी परीक्षेदरम्यान उमेदवाराकडून
चक्क ब्लूटूथचा वापर सुरू होता. या उमेदवाराला ब्लूटूथचा वापर करताना रंगेहाथ पकडण्यात आलं आहे.
ओशिवरा येथील रायगड मिलिटरी स्कूलमध्ये लेखी परीक्षेदरम्यान आरोपी उमदेवाराने उत्तरे मिळविण्यासाठी कानात ब्लूटूथ लपवला होता. तो वारंवार आपल्या कानाला स्पर्श करत होता त्यामुळे अधिकाऱ्यांनी तरुणाची तपासणी केली त्यावेळी पर्यवेक्षकांना आरोपीच्या कानात छोटेसे ब्लूटूथ डिव्हाइस आढळून आले. सदरील तरुणा विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.