आरोग्य व शिक्षण
डॉ.काशिद, डॉ.हिरवे आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित…!
केज दि.१७ – येथील नगर पंचायत व जनविकास परिवर्तन आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा आदर्श शिक्षक पुरस्कार बाबुरावजी आडसकर महाविद्यालयातील वनस्पती शास्त्र विभागातील प्राध्यापक डॉ.एन.जी. काशिद व डॉ.बी.जे.हिरवे यांना प्रदान करण्यात आला.
राष्ट्रमाता जिजाऊ व सावित्रीबाई फुले यांच्या संयुक्त जयंती सोहळ्यात शिक्षण, पत्रकारिता, वैद्यकीय शिक्षण, संगित, महिला बचतगट इत्यादी क्षेत्रात नाविन्यपूर्ण काम करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार देवुन सन्मानित करण्यात आले. नगराध्यक्षा सीता बनसोड, हारुण इनामदार यांच्या हस्ते डॉ.काशिद व डॉ.हिरवे यांना शिक्षण व संशोधन क्षेत्रातील नाविन्यपूर्ण कामाबद्दल पुरस्कार देवुन सन्मानित करण्यात आले.
त्यांच्या या यशाबद्दल छ.शिवाजी शिक्षण संस्थेचे सचिव रमेशराव आडसकर, अर्चनाताई आडसकर, प्राचार्य डॉ.एम.जी.फावडे, अधिक्षक पी.एस.भोसले, ग्रंथालय प्रमुख डॉ.आशा बोबडे, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.