ब्रेकिंग

”त्या” कामगाराच्या मृत्यूचे प्राथमिक कारण आले समोर….!

12 / 100

केज दि.१७ –  शहरातील एका दारूच्या दुकानासमोर आवादा कंपनीमध्ये कामगार म्हणून काम करत असलेल्या एका कामगाराचा मृतदेह (दि.१७) आढळून आला होता. मात्र सदरील व्यक्तीचा मृत्यू नेमका कोणत्या कारणातून झाला हे स्पष्ट जरी झालेले नसले तरी त्या व्यक्तीचा मृत्यू सर्प दंशाने झालयाची प्राथमीक माहिती समोर आली आहे.

                शहरातील अतिशय गजबजलेल्या ठिकाणी असलेल्या एका दारूच्या दुकानासमोर आवादा कंपनीमध्ये कामगार  असलेल्या व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. सदरील घटनेची माहिती मिळताच केज पोलिसांनी पुढील कार्यवाही करत सदर मृतदेह उपजिल्हा रुग्णालयामध्ये तात्काळ घेऊन जात त्या ठिकाणी तपासणी केली आणि डॉक्टरांनी मृत असल्याचे घोषित केले.
            दरम्यान सदरील मृतदेह आढळल्यानंतर वेगवेगळ्या चर्चेला उधाण आले होते. मात्र सदरील व्यक्तीचा मृत्यू हा सर्पदंशाने झाला असल्याची प्राथमिक माहिती पोलिस आणि रुग्णालयाकडून देण्यात आली आहे.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close