आरोग्य व शिक्षण

केज शहरासह तालुक्यातील नागरिकांसाठी मोठी सोय….!

10 / 100
केज दि.१८ – मेडिकेअर सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल, बीड व साई सुर्या डायग्नोस्टिक क्लिनिक, केज यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत किडनी विकार व हदयरोग तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले आहे.
           रविवार दि.१९ रोजी स. ११ ते ०३ या वेळेत साई सुर्या डायग्रोस्टिक क्लिनिक, पिंपळाच्या झाडाजवळ, कानडी रोड केज ता. जि. बीड येथे शिबिर आयोजित करण्यात आले आहे. किडनी विकार तज्ञ केजमध्ये येत असून यामध्ये डॉ. अजित घोडके (किडनी विकार तज्ञ व किडनी प्रत्यारोपण तज्ञ) तपासणी करणार आहेत. सदरील शिबिरात मुतखड्यांचे व प्रोस्टेट ग्रंथीचे आजार, रक्तामधील युरिया व क्रियाटिनीन वाढलेले असणे,उच्च रक्तदाब व डायबिटीज संबंधी किडनी उपचार, डायलिसिस (Hemodiayasis Peritoneal Dialysis), डायलिसिस कॅथेटर (Temporary and Permanent), किडनी प्रत्यारोपन उपचार व मार्गदर्शन, क्रिटिकल केअर नेफ्रॉलॉजी, किडनी बायोप्सीद्वारे निदान, संर्पदंश व विषबाधा संबंधी डायलिसिस उपचार, उच्च रक्तदाब, हृदय विकार (Heart Attack), वॉल समस्या (Volve Problem), हृदयाची अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी, कॉम्पलेक्स अँजिओप्लास्टी, ASD, PDA (Device Closure), Post Bypass (CABG) Care इत्यादी आजाराचे निदान करण्यात येणार आहे.
           दरम्यान, सोनोग्राफी आणि रक्त लघवी मध्ये 50% सुट दिली जाणार आहे. तरी अधिक माहितीसाठी या 9689468892 नंबरवर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close