क्रीडा व मनोरंजनआपला जिल्हाब्रेकिंग
केजच्या लेकीने जिंकला वर्ल्डकप…..!
बीड दि.१९ – क्रीडा वर्तुळातून या क्षणाची सर्वात अभिमानाची बातमी समोर आली आहे. भारतीय महिला संघाने पहिलावहिला खो खो वर्ल्ड कप जिंकला आहे. टीम इंडियाने नेपाळवर अंतिम सामन्यात मात करत ही ऐतिहासिक कामगिरी केली आहे. नवी दिल्लीत रविवारी 19 जानेवारीला हा महाअंतिम
सामना खेळवण्यात आला. या
सामन्यात टीम इंडियाच्या महिला
ब्रिगेडने नेपाळवर 38 पॉइंट्सच्या
फरकाने नेपाळचा धुव्वा उडवला. टीम इंडियाने या स्पर्धेत सलामीच्या
सामन्यापासून धमाकेदार कामगिरी सुरु ठेवली होती. टीम इंडियाने तशीच कामगिरी अंतिम सामन्यातही केली. नेपाळला 78-40 अशा फरकाने पराभूत करत वर्ल्ड कप ट्रॉफीवर नाव कोरलं.
दरम्यान, सदरील महिला खो खो टीमचे कर्णधारपद बीड जिल्ह्यातील कळमअंबा (ता.केज) ची लेक प्रियंका इंगळे हिच्याकडे असल्याने बीड जिल्ह्यातून तिचे मोठ्या प्रमाणावर कौतुक होत आहे