आपला जिल्हा
सह्याद्री मराठी पत्रकार संघाच्या केज तालुकाध्यक्षपदी अनिल ठोंबरे…!

केज दि.२० – सह्याद्री मराठी पत्रकार संघाच्या केज तालुका अध्यक्षपदी पत्रकार अनिल ठोंबरे यांची निवड झाली आहे.
यावेळी निवडीचे नियुक्तीपत्र संघाचे संस्थापक अध्यक्ष गोविंद नाना शिनगारे, संघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष डॉ. जावेद शेख यांची उपस्थिती होती. नवनिर्वाचित तालुका अध्यक्ष अनिल ठोंबरे, तालुका सचिव डॉ लतिफ शेख, कार्याध्यक्ष महादेव दौंड व तालुका संघटक काशीनाथ कातमांडे अशी कार्यकारिणी निवडण्यात आली.
याप्रसंगी पत्रकार संघाचे पदाधिकारी व मित्र परिवार यांचीही उपस्थिती होती.