ब्रेकिंग

किल्लेधारूर ग्रामीण रुग्णालयात महिन्यातून दोन दिवस होणार शस्त्रक्रिया….!

9 / 100

किल्लेधारूर दि.२० – जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात यांच्या संकल्पनेतून ग्रामीण रुग्णालय धारूर येथे प्रत्येक महिन्याच्या पहिल्या व तिसऱ्या गुरुवारी सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया शिबिराची सुरुवात करण्यात आलेली आहे.

       धारूर ग्रामीण रुग्णालयामध्ये दिनांक 17 जानेवारी रोजी चार रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या. यामध्ये प्रथमच धारूर रुग्णालयामध्ये हर्नियाची शस्त्रक्रिया करण्यात आली. तसेच स्तनातील गाठ, कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया व गर्भपात अशा एकूण चार शस्त्रक्रिया डॉ. अशोक थोरात यांनी केल्या. यावेळी भूलतज्ञ म्हणून डॉ. बालासाहेब सोळंके (वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय धारूर) यांनी कर्तव्य पार पाडले.तर सदरील शस्त्रक्रियांसाठी डॉ. योगेश्वरी शिंदे (वैद्यकीय अधिकारी) व सर्व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
             दरम्यान, धारूर ग्रामीण रुग्णालय अंतर्गत येणाऱ्या गरजू रुग्णांनी लाभ घेण्याचे आवाहन वैद्यकीय अधिक्षक डॉ.बालासाहेब सोळंके यांनी केले आहे.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close