#Accident

मस्साजोग शिवारात आढळला गंभीर जखमी अवस्थेतील इसम….!

12 / 100 SEO Score
केज दि.२१ – तालुक्यातील मस्साजोग Massajog शिवारात आरणगाव रोडवर एक अनोळखी इसम गंभीर दुखापत झालेल्या अवस्थेत (दि.२१) मंगळवार रोजी सकाळी सहाच्या सुमारास आढळला आहे.
              केज – बीड रोडवरून उत्तरेश्वर पिंपरी कडे जाणाऱ्या रस्त्यावर सदरील इसम गंभीर दुखापत झाल्याचा अवस्थेत पडलेला आहे. सदरील इसम हा तालुक्यातील बेलगाव येथील असल्याचे सांगितल्या जात असून नाव अद्याप स्पष्ट झालेले नाही.
           दरम्यान, सदरील इसमाची वैद्यकीय तपासणी झालेली नसली तरी दोन्ही पाय मोठ्या प्रमाणावर क्षतीग्रस्त झाले असून इसम हा मृत झाला असावा असे दिसत आहे.तर अज्ञात वाहनाच्या अपघातात सदरील इसम जखमी झाल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. केज पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत अशी माहिती पीआय वैभव पाटील यांनी दिली.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close