आपला जिल्हा

जिल्ह्यातील दहा सरपंचांसह 431 ग्रामपंचायत सदस्य अपात्र….!

7 / 100
बीड दि.21 –  आरक्षीत जागेवरून निवडून आलेल्या सदस्याने निवडणुकीनंतर बारा महिन्याच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असते.मात्र हे करण्यात कमी पडलेल्या बीड जिल्ह्यातील दहा सरपंचांसह सुमारे 431 ग्रामपंचायत सदस्यांना बीडच्या जिल्हाधिकार्‍यांनी दणका दिला आहे. या सदस्यांचे ग्रामपंचायत सदस्यत्व रद्द करण्याचे आदेश जिल्हाधिकारी आविनाश पाठक यांनी काढले असून यामध्ये केज तालुक्यातील 63 सदस्यांचा समावेश आहे.
                  बीड जिल्ह्यात 2020 नंतर वेगवेगळ्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या होत्या. ग्रामपंचायत निवडणुकीत आरक्षीत जागेवरून निवडणुक लढविलेल्या व निवडून आलेल्या सदस्यांना बारा महिन्याच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहेत असे न झाल्यास त्यांची निवड आपोआप रद्द होत असल्याची तरतूद ग्रामपंचायत अधिनियमात आहे. असे असताना अनेक सदस्यांनी आणि सरपंचांनी अद्याप जात वैधता प्रमाणपत्र सादर केले नव्हते. या सर्वांच्या विरोधात आता बीडच्या जिल्हाधिकार्‍यांनी कारवाई केली आहे. जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे सात तालुक्यातील सुमारे 431 ग्रामपंचायत सदस्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहेत. यात दहा सरपंचांचा समावेश आहे.
        दरम्यान, चिंचोली नाथ, पाचेगाव (ता.पाटोदा), घागरवाडा, पांगरी, कोळपिंप्री, मैदांवाडी, गांजपूर (ता.धारूर), कोपरा (ता.अंबाजोगाई), फुलेपिंपळगाव, शिंदेवाडी (ता.माजलगाव) या गावचे 10 सरपंच अपात्र झाले असून पाटोदा-41, धारूर-71,केज-63, अंबाजोगाई-42, आष्टी-98, माजलगाव-99, वडवणी-17 असे  एकुण- 431 सदस्य अपात्र ठरवण्यात आले आहेत.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close