संपादकीय
केज शहरात पुन्हा सीसीटीव्ही बसवण्यात येत आहेत…..!
केज दि.२८ – शहराचा दिवसेंदिवस झपाट्याने विस्तार होत आहे. ग्रामीण भागातील हजारो नागरिक शहरात येत असतात. त्यामुळे शहरात शांतता व कायदा सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी कांही ठोस निर्णय घेतल्या जात आहेत. आणि याचाच एक भाग म्हणून शहरातील मोक्याच्या ठिकाणी सीसीटीव्ही बसवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, कानडी रोड, हनुमान मंदिर वकील वाडी, बसस्टँड, मंगळवार पेठ कॉर्नर, धारूर चौक (भवानी चौक), डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, मौलाना आजाद चौक रोजा मोहल्ला, हजरत ख्वाजा बाबा दर्गा, रोजा मोहल्ला, अजीजपुरा, आदर्श शाळा, लोंढे गल्ली, अनिल भोजनालय, बीड रोड, कृषी उत्पन्न बाजार समिती कमान केज, सोनार गल्ली, फुले नगर चौक, बीड रोड, धारूर रोड, कळंब रोड, उपजिल्हा
रुग्णालय, अंबेजोगाई रोड, केज, भवानी माता मंदिर परिसर, धारूर रोड, केज उमरी रोड (बाजारतळ परिसर) असे २१ ठिकाणी सीसीटीव्ही असणार आहेत.
दरम्यान, या पूर्वीही डीवायएसपी श्रीकांत डिसले यांच्या कार्यकाळातही सीसीटीव्ही बसवन्यात आले होते. मात्र कांही महिन्यातच ते बंद पडल्याने आता तसे होऊ नये याची काळजी घेण्याची गरज आहे. तर शहरातील केवळ चौका चौकात सीसीटीव्ही बसवणे गरजेचे असते तरी ज्या भागामध्ये शाळा, महाविद्यालये, क्लासेस च्या परिसरातही सीसीटीव्ही बसवणे गरजेचे आहे आणि नियमित फुटेज पाहून कारवाई होणेही अपेक्षित आहे.