![बस्ता बांधण्यासाठी निघालेल्या कुटुंबावर काळाचा घाला, मुलीच्या वडिलांसह नातेवाईक महिला ठार…!….! बस्ता बांधण्यासाठी निघालेल्या कुटुंबावर काळाचा घाला, मुलीच्या वडिलांसह नातेवाईक महिला ठार…!….!](https://i0.wp.com/sakriynews.in/wp-content/uploads/2022/03/0accident_20logo.jpg?resize=780%2C470&ssl=1)
केज दि.७ – तालुक्यातील कासारी येथील कुटुंब बस्ता बांधण्यासाठी नगरला निघाले असता केज पासून जवळच असलेल्या सांगवी (सा.) पाटी जवळ (दि.७ फेब्रुवारी) अपघात होऊन मुलीच्या वडिलांसह एका महिलेला जीव गमावा लागला आहे.
तालुक्यातील कासारी येथील रामेश्वर शाहूराव डोईफोडे यांच्या मुलीचे लग्न 23 फेब्रुवारी ला होते. त्यामुळे मुलीचे वडील मुलीसह इतर नातेवाईकांना घेऊन नगरला बस्ता बांधण्यासाठी निघाले होते. मात्र सकाळी आठच्या सुमारास ते केज बीड रोडवरील सांगवी पाटी जवळ गेले असता पुलाच्या पुढील वळणावर जीपचा आणि अन्य एका वाहनाचा अपघात झाला. आणि यामध्ये मुलीचे वडील आणि शिक्षक श्रीराम घुले यांच्या पत्नी उर्मिला घुले यांचे अपघाती निधन झाले.
सदरील अपघाताची माहिती मिळताच तात्काळ जखमींना उपचारार्थ हलवण्यात आले. मात्र यामध्ये उर्मिला घुले यांचे जागीच तर मुलीच्या वडीलाचे आंबेजोगाई येथे निधन झाले असल्याची माहिती समोर आली आहे.