क्राइम
पावणे सहा लाखांच्या मुद्देमालासह दोघांना घेतले ताब्यात….!

केज दि.१४ – मस्साजोग येथील व्यापाराऱ्याच्या आडत दुकनातील पावटा (राजमा) चोरीचा छडा स्थानिक गुन्हे शाखा, बीड यांनी लावत सात आरोपी निष्पन्न करुन दोन आरोपींना केले जेरबंद केले आहे. तर 5,76,000/- रु चा मुद्देमालही केला जप्त करण्यात आला आहे.
मस्साजोग येथील धनलक्ष्मी ट्रैडर्स येथे दिनांक 31 जानेवारी रोजी रात्री 09.30 वा ते दि.01 फेब्रुवारी रोजीचे सकाळी 6 वा. दरम्यान अज्ञात चोरटयांनी धनलक्ष्मी ट्रॅडर्स गोडाऊनचा पत्रा काढुन राजम्याचे (पावटा) 165 कट्टे 7,45,500/- रु चे व नगदी 75000/- रु एकुण 8,17,500/- रु मुद्देमाल चोरुन नेला होता. फिर्यादी गणेश डिगांबर गायकवाड, ट्रेडर्स दुकान चालक, रा.मस्साजोग ता.केज यांचे फिर्यादी वरुन केज पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला होता.
पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांच्या आदेशावरून स्था.गु.शा.बीड च्या पथकाने आरोपीचा शोध घेत असतांना दिनांक 13 फेब्रुवारी रोजी गुप्त बातमी मिळाली की, पावटा चोरीचे कट्टे हे रमेश उध्दव चव्हाण रा.ढोकी ता.जि.धाराशिव, विनोद नाना काळे रा.ढोकी व त्यांचे इतर साथीदारांनी मिळुन चोरी केलेली असून पावटा(राजमा) चोरुन नेण्यासाठी अशोक लेलॅड कंपनीचा पिकअप चा वापर केलेला आहे. चोरीचा माल पिकअपमध्ये टाकुन ढोकी ते कळबं मार्गाने अंबाजोगाई येथे घेवुन जाणार असल्याची खात्रीलायक बातमी मिळाल्यावरुन सपोनि विजयसिंग जोनवाल व स्थागुशा स्टाफ सह तात्काळ रवाना होवुन अंबाजोगाई कडे जाणाऱ्या रोडवरील माळेगाव फाटा येथे सापळा लावला व पिकअपचा पाठलाग करुन थोडया अंतरावर पकडुन रमेश उध्दव चव्हाण वय 27 वर्षे रा. ढोकी, विनोद नाना काळे वय 23 वर्षे दोन्ही रा. ढोकी ता.जि.धाराशिव यांची विचारपूस केली असता त्यांनी एकुण 07 जनांनी मिळुन सदर चोरी केलेली असून त्यांनी विनोद काळे व राहुल लाला पवार यांनी मस्साजोग येथे एक आडत दुकानाची रेकी केली व नंतर त्यांचे इतर साथीदारांनी मिळुन रात्री चोरी करायचा प्लान केला, शंभु कारखाना येथे सर्वांनी जेवण केले व अशोकल लिलँड पिकअप ने कळंब – केज मार्गे मस्साजोग येथे राहुल याने अधिच पाहुन ठेवलेल्या आडत दुकानावर गेले. तेथे एकजण रस्त्यावर पाहणीसाठी ठेवला व बाकी साथीदारांनी पक्कड व पान्हयाने दुकानाचे पत्रा नट काढुन पत्रा बाजुला करुन दुकानातील पावटा (राजमा) चे पोते दुकानाबाहेर काढुन पिकअपमध्ये टाकुन चोरी करुन गावी घेवुन गेले. त्यानंतर आज रोजी शेतकरी बनून अंबाजोगाई येथे आडत दुकानामध्ये विकायचे होते असे ठरवले होते. दोन्ही आरोपींना त्यांचे इतर 05 साथीदारांची नावे विचारली असता त्यातील साथीदार राहुल लाला पवार हा घटनेनंतर अपघातामध्ये मयत झालेला असुन उर्वरित 04 आरोपींचा शोध घेवुन अटक करण्यासाठी शोध सुरु आहे. आरोपीतांचे ताब्यातुन 42 पोते पावटा (राजमा) कि.अ.1,26,000/- रु व एक अशोक लेलँड कंपनीचा पिकअप कि.अं.4,50,000/- रु असा एकुण 5,76,000/- रु चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ताब्यात घेण्यात आलेला रमेश उध्दव चव्हाण वय 27 वर्षे रा. ढोकी (ता,जि.धाराशीव) यांचा पुर्व अभिलेख पाहतो पो.स्टे.बार्शी, परांडा, येथे दरोडा टाकणे व दरोडयाची तयार करणे असे गुन्हे दाखल आहेत. तर विनोद नाना काळे वय 23 वर्षे रा. ढोकी (ता.जि.धाराशिव) यांचा पुर्व अभिलेख पाहता ढोकी पो.स्टे.ला दरोडा, घरफोडी व चोरीचे गुन्हे दाखल आहेत. दोन्ही आरोपींना व जप्त केलेला मुद्देमाल पुढील कार्यवाहीस्तव पो.स्टे.केज यांचे ताब्यात देण्यात आलेला आहे. उर्वरित आरोपींचा शोध चालु आहे. पुढील तपास पो.स्टे.केज व स्था.गु.शा.बीड करीत आहेत.
सदरची कामगिरी ही नवनीत काँवत पोलीस अधीक्षक बीड, सचिन पांडकर अपोअ बीड, चेतना तिडके अपोअ अंबाजोगाई व पो.नि. उस्मान शेख यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि विजयसिंग जोनवाल, पोउपनि महेश विघ्ने, पोउपनि हनुमान खेडकर, पोह/ महेश जोगदंड, भागवत शेलार, राजु पठाण, तुषार गायकवाड, पोअं/बप्पासाहेब घोडके, अश्विनकुमार सुरवसे, चालक पोह/गणेश मराडे स्था.गु.शा.बीड यांनी केली आहे.