देशविदेश

अंतिम वर्षाची परीक्षा तीन ऐवजी एक तासाची ?

ऑनलाईन प्रवेश अर्जाला मुदतवाढ

???? दिवसेंदिवस कोरोना विषाणू झपाट्याने वाढत आहे. मात्र प्रवाशांना सुरक्षित प्रवास करता यावा यासाठी एसटी बसच्या आसनांमध्ये पडदे बसवण्यात येणार आहे. कोरोनामुळे बंद असलेली एसटी, 20 ऑगस्टपासून सुरु झाली आहे.
???? सीईटी परीक्षांकरिता या आधी अर्ज करू शकले नाहीत त्यांना सीईटी सेलकडून पुन्हा एकदा संधी देण्यात येणार आहे. सीईटी सेलमार्फत विविध 12 अभ्यासक्रमांच्या सीईटीच्या ऑनलाईन प्रवेश अर्ज करण्याच्या प्रक्रियेला 7 सप्टेंबर ते 8 सप्टेंबरपर्यंतची मुदतवाढ देण्यात आली आहे.
????  अंतिम वर्षाची परीक्षा ही तीन तासांऐवजी एक तासाची व 100 गुणांऐवजी 50 गुणांची घेण्यात येणार असल्याचे संकेत शुक्रवारी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिले. मात्र, या परीक्षा घेताना तंत्रज्ञानावर भर देत लेखी परीक्षांसाठी विद्यापीठाला एमसीक्यू, असाईमेंट किंवा ओपन बूकचे पर्याय खुले केले आहेत. तसेच प्रात्याक्षिक परीक्षा स्कायपे सारख्या मिटींग अ‍ॅप किंवा टेलिफोनिक पद्धतीने घेण्याच्या सूचनाही उदय सामंत यांनी केल्या आहेत.
???? रावेर मतदार संघाच्या खासदार रक्षाताई खडसे यांच्या प्रयत्नाने महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागातील २५ पैकी २३ अतिरिक्त जिल्हाधिकारी पदावरील अधिकाऱ्यांना भारतीय प्रशासन सेवेत २ वर्षाच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर पदोन्नती प्राप्त झाली आहे.
???? बारामती शहरात 14 दिवसांचा जनता कर्फ्यू जाहिर केला आहे. यादरम्यान मेडिकल, दुध या अत्यावश्यक सेवा सुरु राहणार आहेत.
???? औरंगाबाद : जायकवाडी जलाशयात(धरण) आज शनिवारी दुपारी बाराला ९७ .७४ टक्के पाणीसाठा झाल्याने धरणाचे दोन दरवाजे अर्धा फुटाने उचलण्यात आले असुन त्यातून १ हजार ४८ क्युसेक व जलविद्युत केंद्रातुन १ हजार ५८९ क्युसेक असा एकूण २ हजार ६३७ क्यूसेक पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीपात्रात सुरु करण्यात आला आहे.
???? अहमदाबाद – लॉकडाऊनमुळे निर्माण झालेल्या आर्थिक तंगीतून निराश झालेल्या गुजरातमधील एका कुटुंबातील पाच जणांनी विष पिऊन आपली जीवनयात्रा संपवली आहे. अशा घटना देशात वारंवार घडत असून त्यामुळे देशातील अस्वस्थता वाढीला लागली असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
???? सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी समजल्या जाणाºया उजनी धरणातील पाणीसाठा १०० टक्के पार झाला आहे़. धरणावरील वीजनिर्मितीचा प्रकल्प कार्यान्वित झाला आहे़. सध्या २४ तासाला ३ लाख युनिट विजेची निर्मिती होत असल्याची माहिती अतिरिक्त कार्यकारी अभियंता आऱ एस़ कदम यांनी दिली.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close