बीड दि.२० – जिल्हा समाज कल्याण कार्यालय व ज्ञानेश जनकल्याण सेवाभावी संस्था बीड यांच्या संयुक्त विद्यमानाने दिव्यांग मुला-मुलींच्या क्रीडा स्पर्धा दिनांक 15 व 16 फेब्रुवारी रोजी गेवराई येथे संपन्न झाल्या. यामध्ये केज (उमरी) येथील मूकबधिर निवासी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी राज्यपातळीपर्यंत मजल मारली.
विद्यालयाच्या कुमारी विद्या रमेश तोंडे, वयोगट 8 ते 12 लांब उडी प्रथम, कुमारी अश्विनी कैलास तनपुरे वयोगट 13 ते 16, 100 मीटर धावणे प्रथम क्रमांक, आणि लांब उडी या क्रीडा प्रकारात तृतीय क्रमांक मिळवला. या दोघींचीही राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.तर मुलांच्या स्पर्धेत चि. साद अमर शेख वयोगट 8 ते 12 लांब उडीत तृतीय क्रमांक पटकावला आहे. विजेत्या विद्यार्थ्यांना सुवर्ण, कास्यपदक व प्रमाणपत्र देऊन समाज कल्याण अधिकारी श्रीमती मेश्राम व श्री. नखाते यांनी विजेत्यांना सन्मानित केले. विशेष बाब म्हणजे महिला कर्मचाऱ्यांसाठी वन मिनिट्स स्पर्धेमध्ये हिंगे अशा नारायण कला शिक्षिका यांनी जिल्ह्यातून प्रथम क्रमांक मिळवत 5555 रोख, सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र मिळविले आहे. सर्व विजेत्यांचे संस्थाचालक विकास कदम, मुख्याध्यापक डी .डी. सूर्यवंशी यांनी अभिनंदन केले.
यासाठी विशेष शिक्षक अण्णासाहेब सोळंके, महेश सोळंके, आशा हिंगे, योगेश काळे, सत्यप्रकाश हाके, यांच्यासह शाळेतील सर्वांचे विशेष मार्गदर्शन लाभले.