शिवरायांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण करण्यासाठी पाच लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध….!

केज दि.22 – तालुक्यातील आनंदगाव सारणी येथे मोठ्या जल्लोषात शिवरायांचा पुतळा उभारण्यात आलेला आहे. छत्रपतींच्या जयंतीच्या अगोदर सदरील पुतळा उभारण्यात आल्याने गावकऱ्यांसह परिसरातील शिवप्रेमी आनंदी आहेत. आणि यातच आता आणखीन आनंदाची भर पडली असून शिवरायांच्या पुतळ्याच्या शुशोभीकरणासाठी खासदार रजनीताई पाटील यांच्या माध्यमातून पाच लक्ष रुपयांचा फंड बीड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राहुल सोनवणे यांनी जाहीर केला आहे.
तालुक्यातील आनंदगाव सारणी येथे शिवरायांचा पुतळा उभारल्यानंतर मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात आली. आणि याचाच एक भाग म्हणून बीड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राहुल सोनवणे यांनी शनिवारी दिनांक 22 फेब्रुवारी रोजी आनंदगाव येथे जाऊन शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन केले आणि शिवपूजनही करण्यात आले. यावेळी राहुल सोनवणे यांनी खासदार रजनीताई पाटील यांच्या माध्यमातून पुतळ्याच्या सुशोभिकरणासाठी पाच लक्ष रुपयाचा निधी जाहीर केल्याने गावकऱ्यांमध्ये मोठा उत्साह दिसून येत होता. सुशोभीकरणासाठी पाच लक्ष रुपये जाहीर केल्यामुळे आनंदगाव आणि परिसरातील गावकऱ्यांनी खासदार रजनीताई पाटील तसेच जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुल सोनवणे यांचे आभार व्यक्त केले.