संपादकीय
डिजिटल मिडियाची नूतन कार्यकारिणी जाहीर…..!

केज दि.२४ – तालुका डिजिटल मिडियाची नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून यामध्ये अध्यक्षांसह इतर पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या आहेत.
मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न असलेल्या डिजिटल मीडियाच्या नूतन पदाधिकाऱ्यांची केज तालुका कार्यकारणी जाहीर करण्यात आली. डिजिटल मीडिया परिषदेचे जिल्हाध्यक्ष दिनकर शिंदे यांच्या सूचनेवरून केज तालुका समन्वयक विजय आरकडे यांनी कार्यकारिणी निवड बैठक बोलावली होती. शहरातील सक्रिय पत्रकार भावनामध्ये डिजिटल मीडियाच्या सर्व सदस्यांच्या उपस्थितीमध्ये कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यामध्ये तालुकाध्यक्ष म्हणून पत्रकार रामदास तपसे, कार्याध्यक्ष म्हणून इकबाल शेख, सचिव पदी प्रकाश मुंडे, उपाध्यक्ष म्हणून अजय भांगे तर संघटक म्हणून सनी शेख यांची निवड करण्यात आली. सदरील निवडी जाहीर केल्यानंतर नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करून जिल्हाध्यक्ष दिनकर शिंदे यांना कार्यकारिणी पाठवण्यात आली. यावेळी पत्रकार धनंजय कुलकर्णी, सुहास चिद्रवार, डी.डी. बनसोडे, गौतम बचूटे, संतोष गालफाडे, रमेश गुळभिले, दशरथ चौरे, मुबसिर खतीब, महादेव गायकवाड यांची उपस्थिती होती.