आपला जिल्हा
सद्भावना पद यात्रेत हजारो नागरिक होणार सहभागी…..!

बीड दि. ३ – मागच्या काही महिन्यांपासून सामाजिक सोलोख्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. वेगवेगळ्या समाजामध्ये दुरावा वाढत चालल्याचे चित्र महाराष्ट्रामध्ये दिसून येत आहे. मात्र हे महाराष्ट्राच्या प्रगतीला कुठेतरी बांधक ठरत असून सामाजिक सलोखा अबाधित राहण्यासाठी कुणीतरी पुढाकार घेणे गरजेचे आहे. आणि म्हणूनच भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या माध्यमातून सामाजिक सलोखा अबाधित ठेवण्यासाठी सद्भावना पदयात्रेच्या उपक्रमातून वाढत चाललेली दरी कमी करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
महाराष्ट्र ही सांस्कृतिक आणि सामाजिक सलोखा राखणारी भूमी म्हणून पाहिल्या जाते. मात्र काही दुर्दैवी घटना घडल्याने सामाजिक स्वास्थ्य काही प्रमाणात का होईना बिघडलेले दिसत आहे. आणि यावर कुणीतरी बोलणे आणि पाऊल उचलणे हे गरजेचे आहे. आणि याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या वतीने प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली आणि खा.रजनी ताई पाटील यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रात सद्भावना पदयात्रा निघणार आहे. आणि या सद्भावना पद यात्रेचा पहिला टप्पा बीड जिल्ह्यातून सुरू होत आहे.
केज तालुक्यातील मस्साजोग येथूनआठ मार्च रोजी सकाळी साडेआठ वाजता सद्भावना पदयात्रा निघणार आहे. दोन दिवसाच्या पदयात्रेमध्ये नेकनूर येथे मुक्काम करून दुसऱ्या दिवशी पदयात्रा बीड येथे पोहोचणार आहे. आणि त्याच अनुषंगाने पदयात्रेमध्ये मोठ्या प्रमाणावर सर्वपक्षीय आणि सर्वच समाजातील घटकांनी सहभाग घ्यावा यासाठी बीड जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल सोनवणे हे मागच्या आठ दिवसांपासून तालुकानिहाय बैठका घेत आहेत. प्रत्येक तालुक्यामध्ये जाऊन प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना सद्भावना पद यात्रेमध्ये मोठ्या प्रमाणावर सहभागी होण्याचे आवाहन ते करत आहेत. सदरील सद्भावना पदयात्रा ही कुठल्याही एका पक्षाची नसून जिल्ह्यामध्ये सामाजिक सलोखा वाढीस लागावा यासाठी ही पदयात्रा असल्याचे सोनवणे हे ठीक ठिकाणी जाऊन सांगत आहेत. आणि या आवाहनाला मोठ्या प्रमाणावर तालुका निहाय प्रतिसाद मिळत असून सद्भावना पद यात्रेत हजारो नागरिक सहभागी होणार असल्याचे सकारात्मक चित्र सध्या दिसत आहे.