ब्रेकिंग

मालकलाच लुटण्याचा केलेला बनाव फसला…..!

10 / 100
बीड दि.२५ – दिंद्रुड हद्दीत स्वत:चे मालकाचे पैसे लुटायचा बनाव करुन पैसे लुटणाचा गुन्हा केलेल्या आरोपीस स्थानिक गुन्हे शाखा,बीड ने जेरबंद केले आहे.
          अधिक माहिती अशी की, दिनांक 11/03/2025 रोजी 02.02 वा. सैहीमुद्दीने फैमुद्दीन शेख वय 24 व्यवसाय ड्रायव्हर रा. माजलगाव हा दि.10/03/2025 ते 6 वा. सुमारास तेलगांव रोडवर कारी फाटयाजवळ त्याचे ताब्यातील अशोक लेलँड दोस्त वाहन कळंब येथुन केज,धारुर, तेलगाव मार्गे माजलगावकडे येत असतांना कारी फाटयाजवळ आल्यावर यातील अनोळखी तिघेजन दुचाकी वरून मागुन येवुन फिर्यादीस शिवीगाळ करु लागले. फिर्यादीस काहीतरी झाले असेल असे वाटल्याने गाडी रस्त्याचे बाजुला घेवुन थांबवली असता तिन इसमांनी फिर्यादीस शिवीगाळ करुन डोळयात चटणी टाकुन मारहाण करुन गाडीमधील 1,35,800/- रु रोख रक्कम जबरीने चोरुन नेले असल्याची तक्रार पोलीस स्टेशन ला फिर्यादीने दिली.
                      वरील गंभीर गुन्हयाचे अनुषंगाने पो.नि. स्था.गु.शा. उस्मान शेख यांनी त्यांचे पथकास गुन्हा उकल करण्यासाठी सपोनि विजयसिंग जोनवाल व पोउपनि महेश विग्ने यांना आदेश दिले. पोउपनि महेश विग्ने यांनी आपल्या पथकासह दि.22/03/2025 रोजी गुन्हयातील आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली असता गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, सदरचा प्रकार हा इसम नामे रहिम चाँद शेख रा. फुलेनगर माजलगाव याने केला आहे. त्यावरुन त्यास माजलगाव येथुन ताब्यात घेवुन गुन्हा अनुषंगाने बारकाईने विचारपुस केली. सदर गुन्हयातील फिर्यादी सहमुद्दीन फहमुद्यीन शेख रा. फुलेनगर याने त्यास इंस्टाग्राम वरुन कॉल करुन त्याच्या मुलीची तब्यीयत खराब आहे तिच्या उपचारासाठी पैशाची गरज आहे तो मालकाचे कुलरची डिलीव्हरी देवुन कुलरचे पैसे घेवुन येणार आहे, तु कारी फाटयाजवळ पाच ते सहा वाजता थांब आणी कांही इसम मला मारहाण करुन माझे डोळयात मिर्ची पावडर टाकुन माझे कडील पैसे घेवुन गेले असे त्याचे मालकाला सांगतो. असा प्लान करुन कारी फाटयाजवळ दोघांनी येवुन सहमुद्दीने शेख याने त्याचे जवळील नगदी 1,35,800/- रु रहिम चाँद शेख यास दिले आहे. त्यानंतर पो.स्टे.दिंद्रुड येथे गुन्हा नोंद केला आहे.
            सदरचा गुन्हा फिर्यादीनेच त्याचे मालकाचे कुलरचे विक्रीचे पैसे स्व:चे फायद्यासाठी चोरण्याचा बनाव करुन आरोपी रहिम चाँद शेख वय 26 वर्षे रा.फुलेनगर माजलगाव यांचे मतदीने गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले. आरोपी रहिम शेख यास ताब्यात घेवुन त्याचे ताब्यातुन 1,35,800/- रु नगदी जप्त करुन पुढील कार्यवाहीसाठी पो.स्टे.दिंद्रुड यांचे ताब्यात देण्यात आले असुन पुढील तपास पो.स्टे.दिंद्रुड हे करीत आहेत.
           सदरची कामगिरी ही नवनीत काँवत अपोलीस धीक्षक बीड, मा.अपर पोलीस अधीक्षक, बीड व पो.नि. उस्मान शेख यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि विजयसिंग जोनवाल, पोउपनि महेश विग्ने, ग्रेपोउपनि हनुमान खेडकर, पोह/महेश जोगदंड, तुषार गायकवाड, जफर पठाण, पोअं/बप्पासाहेब घोडके, अश्विनकुमार सुरवसे, चापोह/ गणेश मराडे यांनी मिळुन केली आहे.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close