
केज दि.२५ – तालुक्यातील 114 ग्रामपंचायत साठी आज दिनांक 25 मार्च 2025 रोजी तहसील कार्यालयामध्ये आरक्षण जाहीर करण्यात आले. यामध्ये चिट्टी पद्धतीने आरक्षण पद्धत सोडत झाली असून चार वर्षीय चिमुकल्याने चिठ्ठ्या काढून कोणत्या गावांमध्ये कुणाला सरपंच पद मिळणार हे जणू काही स्पष्ट केले. मागच्या काही वर्षांपासून ग्रामपंचायतच्या माध्यमातूनही मोठ्या प्रमाणावर विकास कामे होऊ लागलेले आहेत. मोठ्या प्रमाणावर निधी येऊ लागलेला आहे. आणि गावचा म्होरक्या होण्यासाठी अनेकांची धडपड सुरू झालेली असते. मात्र गावचा म्होरक्या कोण होणार हे आज स्पष्ट झाले आणि आरक्षण सोडत संपन्न झाली. आरक्षण जाहीर झाल्यानंतर आता आपापल्या पद्धतीने ग्रामपंचायत कशी लढवायची ? आणि आपली तर संधी हुकली मग आता कुणाला सरपंचाच्या खुर्चीवर बसवायचे यासाठी रणनीती सुरू झालेली दिसत आहे.
पहा कोणत्या गावात कोणते आरक्षण…..!

