सकल बहुजन समाज, केजच्या वतीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बीड जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी कोरोना काळात कथित भ्रष्टाचार केला असा आरोप केज मतदार संघाच्या आमदार नमिता मुंदडा यांनी विधान सभेत लक्षवेधी च्या माध्यमातून लावून धरला.मात्र सदरील आरोप हा चुकीचा असून सूडबुद्धीने केला आहे. कोरोना काळात डॉ. अशोक थोरात यांनी रस्त्यावर उतरुण व कोरोनाची कसलीही तमा न बाळगता त्यांनी सर्व सामान्यांसाठी काम केले. अशा या कर्तव्यदक्ष कामाच्या व्यक्तीविरोधात केज मतदार संघाच्या आमदार नमीता मुंदडा यांनी सूडबुद्धीने त्यांच्यावर लक्षवेधी लावल्याने आरोग्य मंत्री श्री.अबीटकर यांनी निलंबनाची कार्यवाही केली आहे.
दरम्यान, डॉ. अशोक थोरात यांच्यावर केलेली कार्यवाही तात्काळी मागे घ्यावी अन्यथा केज तालुक्यात तीव्र स्वरुपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे.